शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या नशीबी मोडकी तोडकी बस; आधारवाडी चौकात बस झाली ब्रेकडाऊन

By मुरलीधर भवार | Updated: October 12, 2023 15:42 IST

या बसमध्ये प्रवाशांकरीता बसण्यासाठीच्या सीट तुटलेल्या होत्या.

कल्याण-पडघ्याहून प्रवाशांना घेऊन निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस आज दुपारी कल्याणच्या आधारवाडी चौकानजीक बंद पडली. प्रवाशांच्या नशीबी मोडक्या तोडक्या बसमधून प्रवास करणे आहे. या मोडक्या तोडक्या बसचा व्हिडिओ प्रवाशांनी काढला आहे. त्यामुळे भंगार झालेल्या बसेस प्रवाशांकरीता चालविला जात असल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांची जीव धोक्या येऊ शकतो ही बाब या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाली आहे.

कल्याण बस डेपोतून कल्याण पडघा मार्गावर बस चालविली जाते. ही बस गांधारी मार्गे चालविली जाते. आज कल्याण डेपोतून कल्याण पडघ्याला प्रवासी घेऊन निघाली. ही बस प्रवाशांना पडघ्याला सोडून पुन्हा पडघा येथून प्रवासी घेऊन कल्याणच्या दिशेने निघाली. ही बस कल्याणच्या आधरवाडी चौकात आली असता बंद पडली. दुपारी सव्वा दोन वाजता ही घटना घडली. वाहक चालकाने बस बंद पडल्याने कल्याण बस डेपोला त्याची कल्पना दिली. कल्याण बस डेपोतून पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली.

प्रवाशांना बसची व्यवस्था करुन दिली गेली असली तरी दरम्यानच्या काळात प्रवाशांनी बंद पडलेल्या बसचा व्हिडिओ काढला. या बसमध्ये प्रवाशांकरीता बसण्यासाठीच्या सीट तुटलेल्या होत्या. तसेच बसच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या होत्या. त्याचबरोबर चालकाच्या शेजारी असलेला आरसा हा दोरीने बांधलेला होता. प्रवाशांनी व्हिडिओ करुन तोडक्या मोडक्या बसची पोलखोल केली आहे. एसटी महामंडळाची बस ही सामन्यांच्या प्रवाशांचा आधार आहे. मात्र या बसेस तोडक्या मोडक्या असतील तर त्यातून प्रवाशांनी कसा काय प्रवास करायचा. तसेच त्यांच्या जिवीत सुरक्षिततेची काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कल्याण डेपोला नव्या बसेस मिळालेल्या नाहीत. जुन्या बसेस चालविल्या जातात. त्याची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी केली जात असल्याचा दावा डेपो व्यवस्थापनाकडून केला जात असला तरी आजच्या प्रवाशांच्या व्हिडिओतून तो किती फोल आहे हेच त्यातून उघड झाले आहे. या संदर्भात कल्याण बस डेपोचे व्यवस्थापक महेश भोये यांच्याकडे विचारणी केली असता त्यांनी या विषयी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.