शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

केमिस्ट असोसिएशन प्रतिनिधी मंडळाचा ब्रिसबेन येथील जागतिक परिषदेत सहभाग

By अनिकेत घमंडी | Updated: September 24, 2023 10:48 IST

अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या माध्यमातून दौरा

डोंबिवली - अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशन चे प्रतिनिधी मंडळ ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन या शहरात आयोजित एफआयपी वर्ड काँग्रेस मध्ये सहभागी होण्यासाठी जात आहेत. अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास दौरा होत आहे.

ब्रिसबेन या ठिकाणी आयोजित परिषदे मध्ये फार्मसी क्षेत्रात जागतिक स्तरावर होणाऱ्या घडामोडी यासह विविध विषयांवर संवाद सत्र होणार आहे. भारतातून प्रथमच 70 पेक्षा जास्त फार्मासिस्ट  24 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या परिषदेत सहभागी होत असल्याचे संस्थेच्या डोंबिवली शाखेचे निलेश वाणी यांनी  सांगितले.

जागतिक पातळीवर आरोग्य क्षेत्रात होणाऱ्या  नवनवीन बदलाची माहिती  भारतातील फार्मासिस्ट ला मिळावी व सामान्य माणसास उत्तम सेवा मिळावी हा राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा उद्देश आहे.  या परिषदेच्या माध्यमातून मिळणारी माहिती सहभागी प्रतिनिधी आपआपल्या भागातील फार्मासिस्ट ला देतील ज्यामुळे भारतातील फार्मासिस्ट अद्ययावत होऊन उत्कृष्ट रुग्ण सेवा मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र मध्ये देखील केमिस्ट असोसिएशन व फार्मसी कौन्सिल च्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर विविध उपक्रम च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला जातो.  यामध्ये विविध उपक्रम सोबत अवयव दानाचे महत्वही समाजात रूढ करणे यावर।विशेष भर दिला जाईल तसेच रोग निदान शिबीर उकृष्ठ फार्मासिस्ट पुरस्कार  अश्या विविध उपक्रम चा यात समावेश असेल अशी माहिती राज्य केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.