शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अंध विद्यार्थ्यांसह पालकांनी गाणी गाऊन केल्या भावना व्यक्त; ५० अंध विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचें वाटप

By अनिकेत घमंडी | Updated: August 17, 2023 12:38 IST

डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त ...

डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त व्हायचं असतं. अनेक सामाजिक संस्था अलिकडच्या काळात आमच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.  सहकार्य करतात त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आम्ही अशा संस्था, लोकप्रतिनिधी यांचे आभारी आहोत, आमच्या।मुलांना देखील पुढे भविष्यात प्रगती करायची आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या पद्धतीने आपण कार्यरत राहू, संपर्कात राहू अशा भावना अंध विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त गाणी गाऊन व्यक्त केल्या.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी या संस्थेच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष अलंकार तायशेटे यांच्यासह प्रकल्प अध्यक्ष अजय जैन आदींनी जयहिंद अंध कल्याणकारी संस्था, अंबरनाथ या संस्थेच्या ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. मानपाडा रस्त्यावरील शुभम बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना ५० शाळकरी मुलांना बॅग, छत्री, वह्या यासह शालेपयोगी वस्तूंचे वाटप केले. त्यापैकी बहुतांशी पालक हे अल्प उत्पन्न गटात येत असल्याचे अलंकार म्हणाले, तुलनेने त्यांना रोजगाराची संधीही कमीच मिळते. तरी ते आपल्या मुलांना शाळेत शिकवून मोठे करण्यासाठी धपडत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्याकरिता अशा मदतीद्वारे काहीसा हातभार लागतो, असेही अलंकार म्हणाले.

अजय जैन यांनी संस्थेद्वारे असा हा कार्यक्रम राबवण्याचे यंदाचे दहावे वर्ष आहे. माजी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत वह्या उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला मुलांनी व पालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मुलांनी,.पालकांना गाणी गायली, कविता म्हंटल्या, व्याख्यान दिले. वातावरण पाहून काही अंध पालकांनी ही गाणी म्हणून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मुलांनी त्यांच्या समाजाकडून काय अपेक्षा आहेत हे समजावून सांगितले, तर पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांना काय बनवायचे आहे याबद्दलची स्वप्न सांगून त्यासाठी विद्यार्थ्यांना खूप शिकावे लागणार आहे, चांगला व्यक्ती बनायचं आहे असे मत व्यक्त केले. संस्थापकिय अध्यक्ष प्रकाश भराडे , महासचिव सुरेश पवार व कोषाध्यक्ष निशा रघुवंशी हे जयहिंद संस्थेतर्फे या कार्यक्रमासाठी उपस्थि होते.