शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा २० वर्षीय जखमी हर्षलने धीराने केला परिस्थितीचा सामना; कुटुंबाला दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 08:29 IST

अतिरेक्यांनी वडील, काकांना ठार केले, अनोळखी ठिकाणी कुटुंबातील मुलींना दिला धीर

प्रशांत मानेडोंबिवली : घरातील काही मंडळी विश्रांती घेत होती. काश्मीरमध्ये फिरायला गेलेले संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी गप्पा मारत पुढील प्रवासाचे नियोजन करीत असताना अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. माझ्या डोळ्यांदेखत हे तिघे गंभीर जखमी होऊन खाली कोसळले व त्यांचा मृत्यू झाला.

अतिरेक्यांची एक गोळी माझ्या हाताच्या बोटाला चाटून गेल्याने मीही जखमी झालो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या तिघांना मी ‘उठा.. उठा..’ म्हणत होतो. सोबत असलेल्या सर्व महिला व लहान मुलांना सुखरूप घरी आणण्याची जबाबदारी माझ्यावर आल्याची जाणीव झाली. संजय लेले यांचा २० वर्षांचा मुलगा हर्षलने हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला तेव्हा त्याला हुंदका आवरला नाही. आपले दु:ख गिळून तीनही कुटुंबांना सांभाळून धीराने सामना त्याने केला. 

एकट्याने गेला प्रसंगाला सामोरा संजय देसले, अतुल मोने आणि हेमंत जोशी हे मावसभाऊ फिरत होते. त्यांच्यासोबत हर्षल होता. कुटुंबातील उर्वरित सदस्य झोपले होते. अतिरेक्यांनी पुरुष मंडळींना हेरून त्यांच्यावर गोळीबार केला. कुटुंबातील व्यक्तींना गोळीबाराच्या आवाजाने जाग आली तोपर्यंत अतिरेकी गोळीबार करून पसार झाले होते. गोळीबारात संजय, अतुल आणि हेमंत यांचा मृत्यू झाला तर हर्षलच्या हाताच्या बोटाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला. 

गोळीबार थांबल्यानंतर घोडेस्वारांच्या मदतीने कुटुंबाला सुरक्षित स्थळी नेले. हा घडलेला प्रकार हर्षलने नातेवाईक असलेले शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांना सांगितला. कदम बुधवारी काश्मीरला रवाना झाले. तोपर्यंत हर्षल हॉस्पिटल, पोलिस यंत्रणा, शवागार, पोस्टमार्टेम या सगळ्या प्रसंगाला सामोरा गेला.

बोटाला गोळी लागली, तरी धीरोदात्तपणा टिकूनसंजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताच्या बोटाला अतिरेक्याची गोळी लागून तो किरकोळ जखमी झाला. लेले यांची पत्नी कविता, अतुल यांची पत्नी अनुष्का, मुलगी १६ वर्षीय ऋचा, हेमंत यांची पत्नी मोनिका व १५ वर्षांचा मुलगा ध्रुव असे सहा जण सुखरूप आहेत. 

खा. श्रीकांत शिंदेंचे पथक रवाना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी रात्रीच त्यांचे पथक श्रीनगरला रवाना केले. पथकासोबत दाखल झालेले स्वीय सहायक अभिजित दरेकर यांना संकटग्रस्त कुटुंबीयांना मदत करण्यास सांगितले होते. आ. रवींद्र चव्हाण, राजेश मोरे आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आदी कुटुंबीयांच्या मदतीसाठी संपर्कात होते.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला