शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली ऑलिम्पिकला ७० शाळांमधून तीन हजार विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

By अनिकेत घमंडी | Updated: February 14, 2024 10:17 IST

लहान मुलांनी टीव्ही, मोबाइल कमी बघावा आणि मैदानात खेळ खेळायला यावे : मिलिंद कुलकर्णी

डोंबिवली: विद्यार्थ्यांनी टीव्ही पाहण्याचा कालावधी कमी करावा आणि मैदानावर जास्त उपस्थिती लावावी असे आवाहन रोटरीचे (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांनी रिजन्सी अनंतम ग्राउंड, डोंबिवली ऑलम्पिक स्पर्धांचे दोन दिवसीय आयोजन केले होते, त्या स्पर्धांमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती बुधवारी देण्यात आली.

कुलकर्णी यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या बत्तीस वर्षे सुरू असणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. त्या कार्यक्रमाचे उदघाटन कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी पूर्वप्रांतपाल डॉ उल्हास कोल्हटकर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ता प्रीती गाडे व सहाय्यक प्रांतपाल शैलेश गुप्ते हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ डोंबिवली रोटरी ऑलिंपिक चे ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताने झाला. डॉन बॉस्को शाळेच्या दोन बँड पथकाच्या तालावर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा मार्च पास झाला. त्या कार्यक्रमानंतर दावडी येथील छत्रपती शिवाजी मंडळाने लाठी काठी, दांडपट्टा, तलवारबाजी या क्रीडा प्रकारांची चित्ताथरारक प्रात्यक्षिक सादर केली. डोंबिवली ऑलम्पिक मध्ये डोंबिवलीतील जवळजवळ ७० शाळांनी सहभाग घेतला होता. खो खो, लंगडी, कबड्डी, ॲथलेटिक्स, लांब उडी, गोलाफेक, कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धात कल्याण डोंबिवलीतील ३००० शालेय मुलांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला.डोंबिवलीकरांनी हजर राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. कबड्डी प्रो निलेश शिंदे यांनी सुद्धा हजेरी लावून या स्पर्धा संयोजनाबद्दल कौतुक केले आणि भविष्यातही रोटरी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा चालू राहिल्या पाहिजेत असे मनोगत व्यक्त केले. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ लोटे यांनी रोटीरी ऑलिंपिक ची पार्श्वभूमी आणि क्लबच्या विविध सामाजिक प्रकल्पाची माहिती दिली. सूत्रसंचालन रो. विनायक आगटे यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यात डोंबिवली तील सहभागी शाळा, शिक्षक, परीक्षक विद्यार्थी, आणि डोंबिवली कर क्रीडाप्रेमींचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे लोटे म्हणाले. संस्थेचे मानद सचिव डॉ. महेश पाटील, प्रकल्प प्रमुख रो सतीश अटकेकर व प्रकल्प संचालक रो. कमलाकर सावंत आणि त्यांचे टीमने दोन दिवसाचे रोटरी ऑलिम्पिक यशस्वी केल्याबद्दल त्यांचे सगळ्यांनी कौतुक।केले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली