शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा हंडा-कळशी मोर्चा काढावा लागेल! पाण्यासाठी रहिवाशांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 02:25 IST

एमआयडीसीतील सुदर्शननगरमध्ये पाण्याचा ठणठणाट

डोंबिवली : एमआयडीसीकडून शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. त्याचा परिणाम शनिवार आणि रविवारच्या पाणीपुरवठ्यावर होतो. काही ठिकाणी पाणी अत्यंत कमी दाबाने येते तर काहींना पाणीच मिळत नाही. हा त्रास वर्षभर सुरू असल्याने रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण आहे. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास हंडा-कळशी मोर्चा काढावा लागेल अथवा ‘रास्ता रोको’ आंदोलन करावे लागेल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. 

एमआयडीसीकडून होणारा पुरवठा शुक्रवारी बंद होता. त्यामुळे शनिवार आणि रविवारी पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. ही समस्या वर्षभर असून काहींना पाणी मिळत नसल्याकडे सुदर्शननगर निवासी संघाचे सचिव विवेक पाटील यांनी लक्ष वेधले आहे. परिसरातील परिचय, मित्रधाम, नव जयश्री, पुरुजीत या सोसायट्यांसह अन्य सोसायट्यांना शुक्रवारपासून पुढील तीन दिवस पाणीच येत नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. दोन ते तीन महिन्यांपासून संबंधित सोसायट्यांतील रहिवासी एमआयडीसीतील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार करत आहेत. प्रत्येकवेळी काहींना काही कारणे देऊन तक्रारींची गंभीर दखल घेतली जात नाही.  आरएक्स २१, आरएक्स २२ आणि आरएक्स २३ साठी जलवाहिनी टाकलेली नाही.  ज्या सोसायटीसाठी जलवाहिनी टाकली त्यांनाही पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे. पाण्याविना रहिवाशांचे हाल सुरू असून एमआयडीसीत राहत असूनही पिण्यासाठी बाहेरून बाटलीबंद पाणी व टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. ही शरमेची बाब असल्याचे पाटील यांनी एमआयडीसीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

गृहसंकुलात पाणीटंचाईकल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील स्वराज नेपच्युन या गृहसंकुलातील रहिवाशांनाही वर्षभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गृहसंकुलात दोन सेक्शन आहेत. एकामध्ये सात माळ्यांचे १० टॉवर आहेत. वर्षभरापूर्वी एक तास पाणी यायचे, ते मुबलक होते. पण काही महिन्यांपासून १० ते १५ मिनिटेच पाणी येते तेही एकदिवसाआड येत असल्याने तीव्र पाणीटंचाई भेडसावत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात