शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणात लग्नसोहळ्याचे आयोजन; गरसेवकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 18:47 IST

कल्याण पश्चिमेकडिल काळा तलाव नजीक असलेल्या मॅरेज लॉनमध्ये  शिवसेनेच्या माजी नगरसेवक सुनील वायले आणि नगरसेविका यांच्या मुलीचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या वर पोहचली आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे " माझे कुटुंब माझी जबाबदारी " व  "मी  जबाबदार " असे म्हणत वारंवार कोरोना परस्थितीचे गांभीर्य  लक्षात आणून दिलंय. मात्र असे असले तरी कल्याणातील शिवसैनिक  मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवतायेत. कल्याणात  शिवसेनेच्या माजी नगरसेवक व नगरसेविका दांपत्याच्या मुलीचं लग्न  हजारो नागरिकांच्या उपस्थित पार पडलं. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी इतक्या दणक्यात हा सोहळा संपन्न होत असताना  पोलीस नेमकं काय करत होते? असा सवाल निर्माण झालाय. 

कल्याण पश्चिमेकडिल काळा तलाव नजीक असलेल्या मॅरेज लॉनमध्ये  शिवसेनेच्या माजी नगरसेवक सुनील वायले आणि नगरसेविका यांच्या मुलीचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोहळ्याला  हजारो नागरिकांची गर्दी दिसून आली आहे.सोशल डीस्टंसिग सोडा मात्र साधा मास्क घालण्याची तसदी देखील नागरिकांनी घेतली।नव्हती. यासंबंधीचा  व्हिडीओ देखील व्हायरल झालाय . काही दिवसांपूर्वी कल्याण पुर्वेतील सेनेचे नगरसेवक नवीन गवळी यांचा देखील वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झालेला. 

शहरात गंभीर परिस्थिती असताना   लोकप्रतिनिधींना सामाजिक भान नसल्याचं  समोर येतंय. महापालिका विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करतेय. मग या सोहळ्यातल्या नागरिकांकडून पण दंड वसूल केला जाईल का? कायदा फक्त सर्वसामान्यांसाठी आहे का? मुख्यमंत्री , तसेच सेनेचे  जिल्हा  नेतृत्व आधी आपल्या पक्षातील प्रतिनिधींचे कान उपटतील  का? असे एक।ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका