शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आधी सांगितले सर्वच होतील, पण ठराविक रस्त्यांचेच होतेय काँक्रिटीकरण!

By प्रशांत माने | Updated: December 17, 2023 16:32 IST

स्थानिकांमध्ये असंतोष; निषेधार्थ मूक आंदोलन.

डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी भागात रस्ते काँक्रीटीकरणाची कामे चालू असून येथील सर्वच रस्ते काँक्रिटचे करण्यात येतील अशी फलकबाजी यापूर्वी करण्यात आली होती. पण आता फक्त ठराविक रस्त्यांचेच काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे समजल्याने येथील स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ज्या ठराविक रस्त्यांचे काँक्रीटीकरण चालू आहे ते रस्ते देखील चुकीच्या नियोजनामुळे पुन्हा खोदावे लागत आहेत. याचा निषेध म्हणून रविवारी नागरिकांनी तोंडावर मास्क बांधत हातात निषेधाचे फलक घेत मुक आंदोलन छेडले.

निवासी भागातील मॉडेल कॉलेज भागातील भाजी गल्ली रोडवर सकाळी १० वाजताा छेडल्या गेलेल्या आंदोलनात सुमारे १५० नागरिकांनी सहभाग घेतला होता. एक तास रस्त्याचा दुतर्फा कडेला उभे राहून त्यांनी हे आंदोलन छेडले. निवासी भागातील सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे, काँक्रिटचे रस्ते निवडणुकीच्या आधी नाही झाले तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार, धुळीने आम्हाला झाला आजार रस्त्यामुळे आम्ही झालो बेजार, आश्वासन फलक होते विभागातील सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण पण आता बनवले ठराविक रस्ते, हाय हाय एमएमआरडीए, केडीएमसी, एमआयडीसी हाय हाय असे लिहिलेले फलक आंदोलनकर्त्यांच्या हाती होते. भोंगळ कारभाराचा नागरिकांना त्रास

नव्याने बनविलेल्या काँक्रिट रस्त्यावर एमआयडीसीकडून नवीन सांडपाणी वाहिन्या तसेच चेंबर टाकण्यात येणार असल्याने हे नवीन रस्ते दोन्ही बाजूंनी तोडण्यात येणार आहेत. पायवाट साठी पेवरब्लॉक टाकण्याचे काम एमआयडीसीच्या सांगण्यानुसार एमएमआरडीएचा ठेकेदाराने बंद केले आहे. वीज, पाणी, सांडपाणी वाहिन्या आणि महावितरणचे डीपी बॉक्स, ट्रान्सफॉर्मर हे काही ठिकाणी रस्त्यांच्यामध्ये आल्याने ते दुरुस्ती करतेवेळी नवीन काँक्रिट रस्ते तोडावे लागत आहेत याकडेही आंदोलनात लक्ष वेधण्यात आले. या एकंदरीतच भोंगळ कारभाराचा मूक आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला.

...तर भव्य मोर्चा काढणार

इथल्या समस्यांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना याआधी अनेकदा कळविण्यात आले होते शिवाय पत्रव्यवहारही करण्यात आला होता. आता पुन्हा येथील सर्व समस्यांसाठी नागरिकांच्या सह्यानिशी पत्र देण्यात येणार आहे. जर त्यातूनही येथील समस्यांची दखल घेतली गेली नाही तर एक भव्य मोर्चा स्थानिक नागरिकांतर्फे काढण्यात येणार आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली