शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी अग्नीवीरांची पहिली तुकडी भारतीय सैन्यात होणार दाखल!

By प्रशांत माने | Updated: March 26, 2023 17:14 IST

या अग्नीवीरांच्या तुकडीला नौदलप्रमुखांसह महावीरचक्र विजेते मार्गदर्शन करणार आहेत.

डोंबिवली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संकल्पनेतुन अग्निपथ या योजनेंतर्गत तयार झालेल्या अग्नीवीरांची पहिली तुकडी प्रशिक्षण पुर्ण करून मंगळवारी भारतीय सैन्य दलात दाखल होत आहे. या अग्नीवीरांच्या तुकडीला नौदलप्रमुखांसह महावीरचक्र विजेते मार्गदर्शन करणार आहेत. विशेष बाब म्हणजे डोंबिवलीकर असलेले माजी नौदल सैनिक आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गजानन जगन्नाथ माने यांना देखील या कार्यक्रमाला अग्नीवर तुकडीला मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले गेले आहे.

मंगळवारी २८ मार्चला आय एन एस (इंडियन नेव्हल शीप) चिलका ओरीसा येथे हा कार्यक्रम होणार आहे. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यातील सैनिकी प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलात दाखल होणा-या अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीत २६०० पुरूष आणि २७८ महिला सैनिकांचा समावेश आहे. या पहिल्या तुकडीला नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार हे संबोधित करणार आहेत. यावेळी निवृत्तीनंतर देखील देशसेवेसाठी महत्वपूर्ण काम करणा-या महावीरचक्र विजेत्यांसारख्या अन्य विभूतींना अग्नीवीरांना मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमाला आमंत्रित केले आहे. यात गजाजन माने यांचाही समावेश आहे.५ एप्रिलला माने पद्मश्रीने होणार सन्मानित

नौदलातून निवृत्त झाल्यावरही सैनिकाच्या कर्तव्याची जबाबदारी लक्षात ठेवून १९८५ पासून अविरतपणे कुष्ठरूग्ण सेवा करणा-या गजानन मानेंच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात दरबार हॉलमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. ठाणो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयामधील ७० वर्षातील सन्मानित होणारे माने हे एकमेव डोंबिवलीकर आहेत. शनिवारी त्यांना डोंबिवलीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘डोंबिवलीकर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.