शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये शंकराच्या पिंडीसमोर नंदी पितोय दूध; व्हायरल व्हिडिओनं भक्तांच्या रांगा

By मुरलीधर भवार | Updated: July 12, 2023 07:01 IST

कल्याण शहरातील खडेगोलवली येथील कैलास नगर साई शक्ती कॉलनीतील साई मंदिरात स्थापन केलेल्या नंदीची मूर्ती दूध पीत असल्याचा व्हिडियो काल सायंकाळच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला

कल्याण - गणपतीची मूर्ती दूध पीत असल्याचा दावा करणाऱ्या अफवा समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार कल्याणमध्ये देखील समोर आला आहे. कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली कैलासनगर परिसरात साई बाबांच्या मंदिरात नंदी दूध आणि पाणी सेवन करत असल्याचं एक व्हिडिओ सायंकाळच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही अफ़वा वाऱ्यासारखी पसरताच महिला पुरुष दूध, पाणी घेऊन मंदिरात धाव घेऊ लागले , काही महिलांनी  आमच्या हाताने नंदीने दूध पिल्याचे सांगितल्याने गर्दीत आणखीनच भर पडली होती.रात्री उशीराने अखेर मंदिर बंद झाले आणि गर्दी हळूहळू ओसरली.

 कल्याण शहरातील खडेगोलवली येथील कैलास नगर साई शक्ती कॉलनीतील साई मंदिरात स्थापन केलेल्या नंदीची मूर्ती दूध पीत असल्याचा व्हिडियो काल सायंकाळच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मूर्तीला पाणी व दूध पाजण्यासाठी भक्तांची गर्दी झाली.  या परिसरातील महिला,पुरुष पाणी, दूध आणून नंदीला पाजत होते. यावेळी नंदी मूर्तीला अनेक लिटर दूध,पाणी देण्यात आले.  मंदिराभोवती भाविकांची वर्दळ होती.भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या पुजाऱ्याने पूजा केली..त्यानंतर नंदीच्या मूर्तीच्या तोंडाजवळ दुधाने भरलेला चमचा ठेवताच नंदी दूध प्राशन करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. पुजाऱ्याने ही बाब मंदिरातील भाविकांना सांगितले.

नंदी दूध पीत असल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला अवघ्या काही क्षणात नंदी दूध पीत असल्याचे बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. पाहता पाहता भाविकांनी नंदीच्या मूर्तीला दूध अर्पण करण्यास सुरुवात केली. लोक वाट्या, ग्लास इत्यादींमध्ये दूध घेऊन मंदिरात पोहोचले आणि चमच्याने नंदी महाराजांच्या मूर्तीला दूध पाणी पाजू लागले.  काही वेळातच भाविकांनी मंदिरात गर्दी केली सायंकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली ही गर्दी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती