शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदीप महाविद्यालयला नॅकचे 'बी' मानांकन; शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिध्द

By मुरलीधर भवार | Updated: October 13, 2022 15:31 IST

२००४ मध्ये संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांनी गोवेली येथे जीवनदीप महाविद्यालयाची स्थापना केली. आज केजी टू पीजी शिक्षण देणारे कल्याण ग्रामीण मधील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून जीवनदीप महाविद्यालयाचा नावलौकिक आहे.

कल्याण- जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे , कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली, या महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आनंददायी वार्ता म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या वतीने (नॅक) गोवेली महाविद्यालयाला 'बी'असे मूल्यांकन मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आले. या मूल्यांकनातून महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे.

२००४ मध्ये संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांनी गोवेली येथे जीवनदीप महाविद्यालयाची स्थापना केली. आज केजी टू पीजी शिक्षण देणारे कल्याण ग्रामीण मधील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून जीवनदीप महाविद्यालयाचा नावलौकिक आहे. दर्जेदार शिक्षणाबरोबरच क्रीडा सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमात महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले असून क्रीडा क्षेत्रात मुंबई विद्यापीठात महाविद्यालयाचा ९ वा क्रमांक आहे.तसेच सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय, वायफाय, सौर ऊर्जा, डिजिटल क्लास रूम विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना,व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम ,विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सर्व तसेच अगदी कमी कालावधीत महाविद्यालयाची झालेली उत्तरोत्तर प्रगती पाहता आज महाविद्यालयाला नॅक 'बी'मूल्यांकन प्राप्त झाले आहे

राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद गुणवत्ता दर्जाला समजण्यासाठी महाविद्यालय, विश्वविद्यालय आणि इतर मान्यताप्राप्त विद्यालय त्यांच्या उच्च स्तरावरील शैक्षणिक मूल्यांकन करते. तसेच शैक्षणिक सुविधा आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधाच्या गुणवत्तेसाठी शैक्षणिक संस्थाचे मूल्यांकन करत असते. या मूल्यांकन समितीने २९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत महाविद्यालयाला भेट देवून मूल्यांकन केले.संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन टप्प्यांमध्ये मूल्यांकन त्यांनी केले. या समितीने पाहणीचा अहवाल बेंगलोर येथील नॅकला सादर केला होता.त्यानंतर पुढील प्रक्रिया होवून नॅकच्यावतीने महाविद्यालयाचे मूल्यांकन जाहीर करण्यात आले. त्यात महाविद्यालयालस २.३३ सीजीपीएससह 'बी'असे मूल्यांकन मिळाले आहे.जीवनदीपच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष घोडविंदे यांनी दिली. या यशात सर्व संस्था पदाधिकारी ,प्राचार्य,डॉ. के.बी कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे,संचालक प्रशांत घोडविंदे, आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. भाग्यश्री पवार यांचाही सहभाग आहे.