शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नाले एसटीपीला जोडण्याचे काम पूर्णत्वास, खासदार शिंदे यांनी घेतली आयुक्तांसोबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 23:29 IST

Kalyan : उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेच्या वतीने नितीन निकम, कैलास शिंदे, उमेश बोरगावकर यांनी आंदोलन सुरु केले आहे.

कल्याण : उल्हास नदी पात्रात प्रक्रिया न करताच नाल्याचे पाणी सोडले जात आहे. कोणत्याही नाल्यातील सांडपाणी नदीत मिसळता कामा नये. त्यासाठी नदी पात्राला मिळणाऱ्या सहा नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलून ते एसटीपीला जोडले जातील. त्याचे काम ६० टक्के पूर्ण झाल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी दिली.उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेच्या वतीने नितीन निकम, कैलास शिंदे, उमेश बोरगावकर यांनी आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन १० फेब्रुवारीपासून सुरु आहे. दरम्यान, खासदार शिंदे यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत घेतलेल्या आढावा बैठकीत नदी प्रदूषणाचा मुद्दा मांडला. त्यावर आयुक्तांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. बैठकीपश्चात खासदार शिंदे यांनी ही माहिती दिली. सांडपाण्याचे नाले वळवले जाणार आहेत. त्याचबरोबर नदी पात्रातून महापालिका मोहने बंधारा येथून पाणी उचलून त्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करते. हा मोहने बंधारा ज्या ठिकाणी आहे, त्याठिकाणी नदीचे पाणी प्रदूषित आहे. हा मोहने बंधारा नदीच्या वरच्या बाजूला स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून तो किमान ३५ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याचा विचार सध्या महापालिका स्तरावर सुरु आहे. या बैठकीपश्चात नदीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

रस्ते व स्वच्छतेसाठी १०० कोटींचा प्रस्ताव तयार - मागच्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापालिकेत आले होते. त्यांनी महापालिकेत जंबो बैठक घेतली होती. त्यावेळी शहरातील रस्ते व स्वच्छतेसाठी १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. कोरोना काळात ही बाब मागे पडली होती. मात्र १०० कोटींच्या निधीसाठी महापालिकेने प्रस्ताव तयार केला असून आहे. - शहरातील काही रस्ते यातून चांगले करण्यात येतील. त्यावर दुभाजक, दिव्यांची व्यवस्था, काही गार्डन आणि तलाव विकसीत केले जातील. हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यासाठी महापालिकेस निधी वितरीत केला जाईल असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीShrikant Shindeश्रीकांत शिंदे