शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप, कल्याणमध्ये घडली घटना

By मुरलीधर भवार | Updated: October 2, 2023 16:46 IST

आधी फेरीवाल्यांनी केली होती मराठी तरुणाला मारहाण

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर एका मराठी तरुणाला परप्रांतीय फेरीवाल्यांनी मारहाण केली. हा प्रकार मराठी तरुणाने मनसे कार्यकर्त्यांना सांगितले. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांना चांगलाच चोप दिला आहे. या घटनेमुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय फेरीवाला हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

वासिंद येथे राहणारा एक मराठी तरुण कल्याणमध्ये काही कामासाठी आला होता. त्याने रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवरील फेरीवाल्यांकडून एक वस्तू खरेदी केली. ती वस्तू चांगली निघाली नाही. त्यामुळे तो तरुण पुन्हा त्या फेरीवाल्याकडे आला. त्याने ती वस्तू फेरीवाल्यांना परत करीत पैसे परत मागितले. तेव्हा फेरीवाल्याने त्या तरुणाशी वाद घातला. वस्तू बदलून मिळणार नाही. तसेच पैसेही परत केले जाणार नाही. तुम्ही मराठी लाेक असेच असता अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधान केले.

त्यामुळे मराठी तरुणाचा स्वाभिमान दुखावला गेला. त्याचा फेरीवाल्यांसोबत वाद झाला. यावेळी फेरीवाल्यांनी त्या तरुणाला मारहाण केली. तरुणाला मारहाण झाल्यावर त्या तरुणाने कल्याणमधील मनसेच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्याच्यासोबत घडला प्रकार त्याने मनसे कार्यकर्त्यांकडे कथित केला. हा प्रकार ऐकून मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी थेट कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉक गाठले. मराठी तरुणाला मारहाण करुन मराठी विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना चांगलाच चोप दिला. ही घटना काल रात्री घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उफाळून आला आहे.

स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्यात यावे यासाठी मनसेकडून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनासह रेल्वे प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जातो. मात्र फेरीवाल्यांच्या विरोधात सरकारी यंत्रणांकडून काही एक कारवाई केली जात नसल्याने फेरीवाल्यांकडून मुजोरी सुरु आहे. हेच या घटनेतून उघड होत आहे.

टॅग्स :kalyanकल्याण