शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेनं केलं मोफत लसीकरण; 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स झाले सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 18:46 IST

मोफत लसीकरण करून वेळोवेळी नागरिकांना मनसेन दिलासा दिलाय.

डोंबिवली- कल्याण डोंबिवली शहरात लसींचा तुटवडा असल्यानं  वारंवार लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. कोरोनाकाळात आर्थिक टंचाई  निर्माण झाल्यान गरीब -गरजू पैसे भरून खाजगी लसीकरण केंद्रात लस घेऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन याअगोदर मनसेनं रिक्षाचालक, नाभीक, घरकाम करणाऱ्या महिला व इतर गरजु घटकांसाठी  मोफत लसीकरणाची मोहीम राबवली होती. आता पुन्हा जागतिक छायाचित्र दिना'निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण करण्यात आलं.  

मोफत लसीकरण करून वेळोवेळी नागरिकांना मनसेन दिलासा दिलाय. अनेक लोकप्रतिनिधी पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आधार घेत चमकोगिरी करत असताना मनसेनं मात्र स्वखर्चाने मोफत लसीकरण करत ख-या अर्थाने " करून दाखवलं" अस म्हणणं वावग ठरणार नाही. कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, अंधेरी, मालाड आदी परिसरातील 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स सहभागी झाले होते. राज्य सरकारने अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे असं मत लसीकरणासाठी आलेल्या  फोटोग्राफर्सने व्यक्त केलंय.  फोटोग्राफर्ससाठी सुद्धा अशाप्रकारचे आयोजन केलं गेल्यानं उपस्थितांनी आनंद व्यक्त केला आहे.   येत्या काळात गरजूंसाठी अशाच प्रकारे उपक्रम राबवणार असल्याचा मानस मनसेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :MNSमनसेCorona vaccineकोरोनाची लस