शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील मेडिकल दुकानाला आग, तरुणासह नागरिकांनी धाडस दाखविल्याने वाचले दुकानदाराचे प्राण

By मुरलीधर भवार | Updated: December 30, 2023 15:55 IST

शहराच्या पश्चिम भागातील स्टेशन परिसरात ललित मेडिकल दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी घडली.

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील स्टेशन परिसरात ललित मेडिकल दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता घडली. आगीमुळे धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांनी पळापळ सुरू केली. एका तरुणासह नागरिकांनी धाडस दाखवीत दुकानात अडकलेल्या मालकास बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.गुरुदेव हाॅटेलनजीक साई विहार इमारत आहे. या इमारतीत वाणिज्य दुकानं आणि सरकारी कार्यालये आहेत. या इमारतीत ललित मेडिकलचे दुकान आहे. या दुकानात अचानक धूर येऊ लागला. आधी नागरिकांना वाटले की, दुकानाच्या मागे कोणी तरी कचरा जाळला असावा त्यामुळे धूर निघत असावा; मात्र धुराचे लोट येऊ लागले. धूर इतका जास्त होता, की ते पाहून दुकानात आग लागल्याचे लक्षात आले.आग लागल्याचे कळताच दुकानदाराला वाचविण्याकरिता प्रतीक दाते याने नागरिकांच्या मदतीने दुकानात शिरण्याचे धाडस दाखविले. प्रतीक आत शिरला. दुकानात सर्वत्र धूरच धूर पसरला असल्याने दुकानमालकाचा हात प्रतीकच्या हाताला लागला. त्यामुळे प्रतीकच्या लक्षात आले की, त्या ठिकाणी दुकानदार आहे. त्याने दुकानदाराला नागरिकांच्या मदतीने दुकानातून बाहेर काढले. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बँकेच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहेत. आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :kalyanकल्याणMedicalवैद्यकीय