शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गझल इंग्रजीत भाषांतरीत करणाऱ्या मसूद पेशइमाम यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन

By मुरलीधर भवार | Updated: September 3, 2022 20:20 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील मसूद यांनी शिक्षक होणे पसंत केले.

कल्याण- उर्दू गझल इंग्रजीत भाषांतरीत करणारे अॅड. मसूद पेशइमाम यांचे कर्करोगाच्या आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते ७२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कल्याणच्या काझी दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील मसूद यांनी शिक्षक होणे पसंत केले. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केल्यावर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यांनी न्याय हक्कासाठी कायद्याचे शिक्षण घेतले. ते वकील झाले. वकील झाल्यावर त्यांनी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग केला. त्यांनी पाच वर्षे पत्रकारीताही केली. त्यांनी द न्यू ब्रेक नावाचे इंग्रजी साप्ताहिक काढले होते. पाच वर्षानी हे साप्ताहिक बंद पडले. त्यानंतर त्यांनी इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, एशियन एज, फ्री प्रेस जर्नलमधून मुक्त पत्रकारिता केली. त्यांचे विविध विषयावरी लेख इंग्रजी वृत्तपत्रतून प्रसिद्ध झाले.

उर्दू भाषेवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांचे उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी प्रख्यात शायर इरतेजा निशाद यांच्या २०० गझलांचे इंग्रजीत भाषांतर केले होते. इंग्रजी ही भाषा जगाकडे पाहण्याची खिडकी आहे. त्या दृष्टीने गझल सगळ्य़ा जगातील इंग्रजी जाणणाऱ्यांना कळावी. तिची नजाकत काय आहे, तो काव्य प्रकार काय आहे याची माहिती व्हावी यासाठी त्यांनी हे उर्दू गझलांचे भाषांतर इंग्रजीत केले होते. समाजात हिंदू मुस्लीम सलोखा राहावा यासाठी त्यांनी पोलिसांच्या शांतता कमिटीवरही काम पाहिले.

त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला निष्पन्न झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने एक चांगला शिक्षक, वकील, पत्रकार, उर्दू भाषा प्रेमी आणि सामाजिक जाण असलेला कार्यकर्ता हरपला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :kalyanकल्याण