शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरीता तोंडाला काळे फासून केडीएमसीवर माेर्चा

By मुरलीधर भवार | Updated: March 15, 2024 14:15 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राज्याचे समन्वयक सचिव अरुण वेळासकर आणि पदाधिकारी सुनिल नायक हे नागरीकांसह तोंडाला काळे सहभागी झाले होते.

कल्याण-डोंबिवली दत्तनगर आयरे परिसरात क्लस्टर योजना राबविली जाणार आहे. या योजनेकरीता बायोमेट्रीक सर्वेक्षण केले जात आहे. काही भूमाफियांमुळे हे सर्वेक्षण बंद पाडले जात आहे. त्यामुळे गरीबांना क्लस्टर योजनेतून हक्काचे घर मिळणार की नाही ? असा संतप्त सवाल उपस्थित करीत नागरीकांनी स्वत:च्या तोंडाला काळे फासून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर निषेध मोर्चा काढला. महापालिका प्रशासनाच्या विरोधात जाेरदार घोषणाबाजी केली.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राज्याचे समन्वयक सचिव अरुण वेळासकर आणि पदाधिकारी सुनिल नायक हे नागरीकांसह तोंडाला काळे सहभागी झाले होते. धोकादायक इमारतीतील नागरीक जीव मुठित धरुन वास्तव्य करीत आहे. त्यांच्या पुनर्वसनाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. महापालिकेने ४१ ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यापैकी सगळ्यात प्रथम कल्याणमधील कोळसेवाडी आणि डोंबिवलीतील दत्तनगर आयरे परिसरात ही योजना प्रथम राबविली जाणार आहे. त्याकरीता बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यासाठी १० कोटी रुपये खर्चाची निविदा मंजूर करुन हे काम एका एजेन्सीला दिले आहे. या एजेन्सीकडून काम सुरु करण्यात आले.

डोंबिवलीतील दत्तनगर आयरे परिसरात बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम भूमाफियांकडून बंद पाडले जाते. सर्वेक्षण सुुरु करण्याची मागणी अनेकवेळा करुन देखील बंद पडलेले सर्वेक्षण सुरु झालेले नाही. सर्वेक्षण पोलिस संरक्षणात केले जाईल असे लेखी पत्र महापालिकेने नायक आणि वेळासकरयांना दिले होते. मात्र महापालिका केवळ पत्र व्यवहार करुन नागरीकांची बोळवण करीत आहे. शासन तुमच्या दारी डोंबिवलीत कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्याच्या हस्ते हा प्रश्न सोडवू असे म्हटले होते. प्रत्यक्षा नागरीकांनी सरकारच्या दारी खेटे मारावे लागतात. यावरुन शासन आपल्या दारी हा कार्यक्रम ही नागरीकांनीची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप नायक यांनी केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका