शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

..तरच या पिढीतले अंतर कमी होईल: प्रणव भांबुरें

By सचिन सागरे | Updated: April 22, 2024 16:51 IST

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ.

सचिन सागरे, कल्याण : झगमगाटी दुनियेत चमकणारे कलावंत आपल्याला दिसतात. पण त्यामागे त्यांनी घेतलेले अविरत श्रमही लक्षात घेतले पाहिजेत. पालकांनीही या पिढीच्या मनापर्यंत पोहचण्याकरिता त्यांना आपुलकीने जवळ घेतले पाहिजे तरच या पिढीतले अंतर कमी होईल असा मोलाचा सल्ला निवेदक व मराठी कलाकार प्रणव भांबुरे यांनी सार्वजनिक वाचनालयकल्याण आयोजित “चला ऐकुया गोष्टी आजींच्या” या बालशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बालगोपाळांना दिला. प्रचंड उत्साहात ६० ते ७० बाळगोपाळांनी शिबिरात सहभाग नोंदविला आहे. 

मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस्कारांची पायाभरणी करणे गरजेचे आहे. अनेक कलावंताना घडविण्याचे महतकार्य सार्वजनिक वाचनालय  कल्याणने केले आहे. वाचन परंपरा जपण्याबरोबरच बालशिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीशीही नाळ वाचनालयाने जोडून ठेवली आहे. 

वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती व बालशिबिर आयोजनाचा मानस सहग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.  

सोमवारपासून ३० एप्रिलपर्यंत चालणाऱ्या शिबिरात प्रार्थना, गाणी, गोष्टी, मातीकाम, कापडी तसेच कागदी फुले बनविणे, पॉट पेंटिंग, फुलांची रांगोळी तसेच इतर विविध प्रकारचे पारंपरिक खेळ घेण्यात येणार आहेत. 

वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, शिबिराच्या प्रमुख वर्षा माने, ज्येष्ठ वाचक सभासद विजयसिंह परदेशी, सुनिता मोराणकर, शुभदा जोशी, अनुष्का गोलिपकर, वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवळे, ग्रंथसेविका, पालक वर्ग, वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणlibraryवाचनालय