शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

वन ट्रिलियन डॉलरचे ध्येय महाराष्ट्र साध्य करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

By मुरलीधर भवार | Updated: February 10, 2024 20:01 IST

कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात क्रेडाई एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने १३ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सायंकाळी भेट दिली.

कल्याण-देशाचे पंतप्रधान पाच  ट्रिलीयन डॉलरचे ध्येय साध्य करण्याचे ध्येय डोळ्यासमाेर आहे. त्यापैकी एक ट्रीलियन डॉलरचे ध्येय महाराष्ट्र साध्य करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केला. निती आयोगाने मुंबई एमएमआरडीए रिजनमध्येच एक ट्रीलीयन डॉलरची क्षमता आहे. तर महाराष्ट्रात किती असेल या गोष्टीचा उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. पुढे बोलताना कल्याण डोंबिवलीत क्लस्टरची गरज आहे. त्यामध्ये बिल्डरांनी सहभागी व्हावे असे आवाहन एमसीएचआयला केले.

कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात क्रेडाई एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने १३ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सायंकाळी भेट दिली. यावेळी एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा, माजी अध्यक्ष रवी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. ९ मीटर रस्त्यालगत असलेल्या इमारतीना आठ माळ्याची परवानगी द्यावी अशी मागणी एमसीएचआयने यावेळी केली. या मागणीला मान्यात देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

दावोस येथे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रा गुंतवणूक करणाऱ््या गुंतवणूकदारांनी ७ लाख ७३ हजार कोटीचे सामंजस्य करार केले. मागच्या वर्षी १ लाख ३७ लाख कोटीचे करार केले गेले. त्यापैकी ८० टक्के कराराची अंमलबजावणी झाली. राज्यात पायाभूत सोयी सुविधा, कनेक्टीव्हीटी, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ यामुळे गुंतवणूकदारांकडून महाराष्ट्राला पसंती दिली जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यानी सांगितले.

मुंबई ठाण्या पाठोपाठ कल्याणमध्ये घर घेण्यास नागरीकांची पसंती आहे. याठिकाणी दुर्गाडी खाडी पूलाचे विस्तरीकरण करण्यात आले आहे. भिवंडी-कल्याण -शीळ फाटा रस्त्याचे सदा पदरीकरण करण्यात आले आहे. कोन ते शीळफाटा या दरम्यान डबल डेकर उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. रिंग रोड प्रकल्पाचे काम सुरु आहे. कल्याण डाेंबिवलीत विकासाला वाव आहे. एमसीएचआय संघटनेशी संबंधित बिल्डर केवळ पैसा कमावित नाही. तर त्यांचे शहराच्या विकासातही योगदान आहे. साईक विकास नियंत्रण नियमावली तयार केली आहे. सरकार विविध सोयी सुविधा देत आहे. त्यामुळे तुम्ही इंच इंच खेळू नका तर मैदानात या. नागरीकांना परवडतील अशी घरे वेळेत पूर्ण करुन देणाऱ््या बिल्डरांचाही सत्कार करा असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी घरोंदा चित्रपटातील दोन दिवाने शहर मे या गाण्याचा आधार घेत ग्राहकांना घर देताना सगळ्या सोयी सोयी सुविधा एमसीएचआय या प्रदर्शनाच्या माध्यमातून एका छताखाली उपलब्ध करुन देत असल्याचा उल्लेख केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkalyanकल्याण