शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील लोढा हेवन शांती उपवन इमारत प्रकरण, रहिवासियांना हक्काची घरे आणि भाडेही दिले जाणार

By मुरलीधर भवार | Updated: March 8, 2023 17:48 IST

महापालिका आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीस पदाधिकारी राजेश मोरे, दीपेश म्हात्रे यांच्यासह शांती उपवन या इमारतीमध्ये राहणारे नागरीकही उपस्थित होते.

कल्याण - डोंबिवली पूर्व भागातील लोढा हेवनमधील शांती उपवन या इमारतीला तडे गेल्याने या इमारतीमधील नागरीकांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीपश्चात इमारतीमधील नागरीकांना बिल्डरकडून घरे बांधून दिली जातील. तसेच बांधकाम पूर्ण होईर्पयत रहिवासियांना भाडे ही दिले जाईल अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.

महापालिका आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीस पदाधिकारी राजेश मोरे, दीपेश म्हात्रे यांच्यासह शांती उपवन या इमारतीमध्ये राहणारे नागरीकही उपस्थित होते. शांती उपवन या इमारतीला तडे गेल्याने या इमारतीत राहणा:या २४० सदनिकाधारकांचा वास्तव्याचा प्रश्न उद्भवला आहे. या नागरीकांना बिल्डरकडून घरे बांधून दिली जाती. त्यासाठी दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्या दरम्यान या नागरीकांच्या घराचे भाडे दिले जाईल. खासदारांनी पुढाकार घेऊन बैठक घेतल्याने शांती उपवनमधील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

चौकट-मेट्रो रेल्वे बदलापूर्पयत नेणारठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. त्याचबरोबर कल्याण ते तळोजा हा मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. त्याचे टेंडरही काढण्यात आले. मात्र उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर याठिकाणीही शेवटच्या टोकार्पयत मेट्रो नेण्याचा संकल्प आहे. बदलापूर्पयत मेट्रो नेण्याची प्रोव्हीजन आम्ही केली आहे. तशा सूचनाही एमएमआरडीएला दिल्या असल्याचे यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले.

चौकट-सरकार शेतक:यांच्या पाठीशीराज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वीही एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून १२ हजार कोटी रुपये शेतक:यांच्या खात्यात जमा केले. हे सरकार शेतक:यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. राज्याच्या अर्थ संकल्पातही शेतक:यांचा नक्कीच चांगला विचार केला जाईल असा विश्वासही खासदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे