शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मेहुण्याची हत्या करणाऱ्यास जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल

By सचिन सागरे | Updated: October 11, 2023 16:49 IST

शहापूर जिल्ह्यातील टहारपूर येथे राहणाऱ्या भारती निपुर्ते हिच्यासोबत प्रमोदचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रमोद मारहाण करून त्रास देत असल्याने भारती माहेरी निघून आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून मेहुण्यावर चाकू हल्ला करत त्याला जीवे ठार मारणाऱ्या प्रमोद पांडुरंग किसले (रा. शेडगाव, ता. भिवंडी) याला कल्याण अतिरिक्त व सत्र न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी जन्मठेप सुनावली. तसेच, आरोपी प्रमोदने शासनाला १५ हजार रुपये भरणा करण्याबरोबरच मयताच्या आईला ५० हजार रूपये भरपाई देण्याची शिक्षाही ठोठावली.

शहापूर जिल्ह्यातील टहारपूर येथे राहणाऱ्या भारती निपुर्ते हिच्यासोबत प्रमोदचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रमोद मारहाण करून त्रास देत असल्याने भारती माहेरी निघून आली होती. प्रमोदने भारतीला परत पाठविण्यासाठी सासरी फोन केला. मात्र, भारतीचा भाऊ पद्माकर तिला सासरी पाठवत नसल्याचा राग प्रमोदला होता. याच रागातून एप्रिल २०१३ मध्ये पद्माकर याच्यावर चाकू हल्ला करून प्रमोदने त्याला जीवे ठार मारले. पद्माकरला सोडविण्यास गेलेल्या महेश जाधव याच्यावर चाकू हल्ला करून प्रमोदने त्याला जखमी केले.

याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्रमोदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप साळुंखे यांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रचना भोईर यांनी काम पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे व कोर्ट ड्युटी पोलीस शिपाई विलास शिंपी यांनी मदत केली.

टॅग्स :Courtन्यायालय