शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमूदान स्फोट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन

By मुरलीधर भवार | Updated: May 27, 2024 16:42 IST

अपघातग्रस्त अमूदान कंपनीच्या ठिकाणी कामगार मंत्री खाडे यांनी आज दुपारी भेट दिली.

मुरलीधर भवार, डोंबिवली:डोंबिवली एमआयडीसीतील अमूदान या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी दोषी अधिकारी वर्गाच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे.

अपघातग्रस्त अमूदान कंपनीच्या ठिकाणी कामगार मंत्री खाडे यांनी आज दुपारी भेट दिली. या वेळी त्यांनी कंपनी परिसराची पाहणी केली. कामगार मंत्री खाडे यांनी सांगितले की, कंपनीतील रिअ‍ॅक्टरमुळे हा स्फाेट झाला आहे. हे प्रथमदर्शनी आढळून येते. त्याठिकाणी बॉयलरचा काही संबंध नाही. कंपनतीली रिॲक्टर कसा आणि का फुटला याची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत अधिकारी दोषी आढळून आल्यास त्यांच्या विराेधात कारवाई केली जाणार आहे. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६४ जण जखमी झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच जाहीर केले आहे. जे कामगार मृत या स्फेटात मृत्यूमुखी पडले. त्यांचे वय आणि त्यांची कंपनीतील सेवा वर्षे याची माहिती घेऊन कंपनी मालकाकडून त्यांना त्यांचे लाभ देण्यासाठी कामगार आयुक्त विभागाकडून आदेशित केले जाणार आहे. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्याठिकाणी एक मोठा खड्डा पडला आहे. तसेच आसपासच्या सात कंपन्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्या कंपन्यातील कामगारही मृत्यूमुखी तर काही जखमी झाल्याची माहिती आहे .

अपघातग्रस्त अमूदान कंपनीचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते का ? हा प्रश्न खाडे यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, सेफ्टी ऑडिट झाले होते असे त्यांनी सांगितले. मात्र झाले होते की नाही ते तपासले जाईले असेही ते म्हणाले. दर दोन वर्षांनी कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट केले जाते. त्यात काही त्रूटी आढळून आल्यास त्या त्रूटी दूर करण्सास सांगितले जाते. त्या त्रूटी दूर केल्या नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया सुरु असते. आत्ता अमूदान कंपनीतील स्फोटाच्या घनटेनंतर पुन्हा कंपन्यांनी सेफ्टी ऑडिट केले गेले आहे की नाही हे तपासले जाईल.

डोंबिवलीतील १५६ कंपन्या धोकादायक आहेत. त्या अन्यत्र हलविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतला होता. त्याचे पुढे काय झाले याची विचारणा खाडे यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले की, धाेकादायक कंपन्या अन्यत्र हलविण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. मात्र कंपन्या अन्यत्र हलविणे कंपनी मालकांना सोयस्कर आहे की नाही हे देखील जाणून घेतले जाणार आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोट