शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीची शून्य कचरा मोहीम कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:48 IST

प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून शून्य कचरा मोहिमेचा डिंगोरा पिटवला जात असला तरी ही मोहीम ठोस कृतीविना कागदावरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर गेले दोन दिवस साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा पडलेला खच पाहता प्लास्टिकबंदीलाही हरताळ फासला गेल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रोड या एकेकाळी सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची खोदकामांनी पुरती वाताहत झाली आहे. या दोन्ही रस्त्यांवरून वाहने चालविणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच या परिसरात जागोजागी उघड्यावर स्थानिकांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांसह कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रासही पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना सोसावा लागत आहे.

गेले दोन दिवस रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा केडीएमसीकडून उचलला न गेल्याने ढीग साचून कचरा रस्त्यावर आल्याचे चित्र या दोन्ही रस्त्यांवर ठिकठिकाणी दिसून येत आहे. तसेच या कचऱ्यात प्लास्टिकचा भरणा अधिक आहे. त्यामुळे आज प्लास्टिकचा वापर नागरिकांकडून सर्रासपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या सर्वच प्रभागांमध्ये आरोग्य निरीक्षकांतर्फे कारवाई सुरू असल्याचा तसेच प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू असल्याचा दावा दरवेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून केला जातो. परंतु, दावा फोल ठरला आहे.

यंदा दिवाळीत मोहीम नाही?- सध्या शून्य कचरा मोहिमेंतर्गत ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी विशिष्ट दिवस ठरविले आहेत. परंतु, आजही घरातील कचरा हा रस्त्यावरच पडत असल्याने ही मोहीम कृतीविना अद्याप कागदावरच आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.- येथील मोठ्या संकुलांच्या बाहेरील कचऱ्याचे डबे तुडुंब भरून वाहत आहे. दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा फटाक्यांचा कचरा पाहता मनपाकडून शून्य कचरा मोहीम राबवली जाते. परंतु, यंदा तसे चित्र पाहायला मिळाले नाही. 

टॅग्स :kalyanकल्याण