शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीची परिवहन समिती तूर्तास नामधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:19 IST

निवडणूक लांबणीवर : रिक्त पदांंचाही निर्णय रखडला

 लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नगरसेवकांचा संपलेला कालावधी तसेच निवडणूक लांबणीवर पडल्याने केडीएमसीत सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे मनपातील परिवहनवगळता अन्य सर्व समित्या बरखास्त झाल्या आहेत. दरम्यान, परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक रखडली असताना फेब्रुवारीत समितीमधील सहा सदस्य निवृत्त होत आहेत. एका सदस्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदाबाबतही सरकारकडून निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे केडीएमसीची निवडणूक होत नाही, तोपर्यंत समितीवर नव्या सदस्यांची नियुक्ती होऊ शकत नाही. परिणामी, तूर्तास समिती नामधारी राहणार आहे, असे जाणकारांचे मत आहे.केडीएमसीतील स्थायी, शिक्षण, वृक्ष प्राधिकरण व महिला-बालकल्याण समिती संपुष्टात आली आहे. मात्र, नगरसेवकांचा सहभाग नसलेली परिवहन समिती अद्याप अस्तित्वात आहे. या समितीत १३ सदस्य आहेत. तर, स्थायी समितीचा सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. परंतु, सध्या स्थायीचे सभापतीपद व समितीमधील एका सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ते पदही रिक्त आहे.परिवहनची सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे, परंतु दोन महिने उलटूनही तारीख ठरलेली नाही. दुसरीकडे फेब्रुवारीत सहा सदस्यही विहीत कालावधीअंती निवृत्त होत आहेत. परिवहन सदस्यांची निवड महासभेत नगरसेवकांकडून होते. परंतु, तोपर्यंत लोकप्रतिनिधींची राजवट अस्तित्वात येणे कठीण असल्याने त्यांच्या निवडीसह पदसिद्ध सदस्य आणि रिक्त पद भरणे, या संदर्भात पेच उभा राहणार आहे.

सदस्य निवडीचा पेचnनगरसेवकांची मुदत संपण्यापूर्वी सभापती मनोज चौधरी यांनी परिवहनची सभा घ्यावी, अशी मागणी सातत्याने केली. परंतु, जी सभा होईल ती सभापतीपदाच्या निवडणुकीचीच होईल, असे सचिव कार्यालयाचे म्हणणे आहे.nफेब्रुवारीत सहा सदस्य निवृत्त होत असल्याने त्यांच्याही निवडीचा पेच उभा राहणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या निवृत्तीनंतर प्रशासकीय राजवटीत समिती अस्तित्वात राहिली असली तरी तिचे अस्तित्व लोकप्रतिनिधींची राजवट येईपर्यंत नामधारीच राहणार आहे.nत्यात शिवसेनेचे सदस्य मधुकर यशवंतराव यांच्या निधनाने रिक्त झालेले पद भरण्यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वीच केडीएमसीने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यावर सरकारने अद्याप मत कळवलेले नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका