शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचा तीन बड्या बिल्डरांना दणका, बेकायदा होर्डिंग प्रकरणी कोट्यवधींचा दंड

By मुरलीधर भवार | Updated: October 10, 2023 21:27 IST

आम आदमी पार्टीचे २७ दिवसापासून सुरु असलेले आंदोलन मागे

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या तीन बड्या बिल्डरांनी बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग लावल्या प्रकरणी त्यांच्याकडून जाहिरात होर्डिंगची रक्कम वसूल करण्यात यावी. या मागणीसाठी आम आदमी पार्टीने २७ दिवसापासून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरु ठेवले हाेते. आज अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले आहे. मात्र येत्या सात दिवसात संबंधित बिल्डरांकडून रक्कम वसूल केली नाही तर महापालिका मुख्यालयासमोर पूर्व सूचना न देता घंटानाद आंदोलन करण्या येईल असा इशारा आम आदमी पार्टीने प्रशासनाला दिला आहे.

आम आदमी पार्टीचे जि्ल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासह महापालिका मुख्यालयासमोर कार्यालयीन वेळेत आंदोलन सुरु केले होते. २७ दिवसापासून हे आंदोलन सुरु होते. बेकायदा होर्डिंग उभारून जाहिरात करणाऱ््या बिल्डरांना दंड आकारण्यात यावा अशी त्यांची मागणी होती. आंदोलनकर्त्यांना महापालिका प्रशासनाच्या वतीने कारवाईचेलेखी आश्वासन दिले गेले आहे. त्यानंतर आज सायंकाली आंदोलन मागे घेतले गेले.

मायक्रोटेक्स डेव्हलपर्स या बिल्डरला ७० लाख ५२ हजार ८४८ रुपये, आऊट अ’ण्ड आऊट इन्फोटेकला १ कोटी ५४ लाख ४३ हजार ७८ रुपये आणि रुनवाल रेसिडेन्सीला ७९ लाख ७९ हजार ६१६ रुपये दंड आकारण्यात आला आहे. या बिल्डर कंपन्यांनी येत्या १५ दिवसात रक्कम भरावी अशी नोटिस मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी बजावली आहे.ही रक्कम ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्तांकडे जमा करावी. ही रक्कम भरली तर जाहिरात होर्डिंग नियमित करण्यात येतील. अन्यथा त्या विरोधात कारवाई केली जाईल असे नोटिसमध्ये बजाविण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्तांनी ही रक्कम भरुन घेण्यात हयगय केल्यास सहाय्यक आयुक्तांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण