शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

.... म्हणून केडीएमसीच्या अधिकाऱ्याने ठेवली कार्यालये बंद; उशिरा आलेले कर्मचारी कार्यालयाबाहेर उभे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 13:57 IST

डोंबिवली विभागीय कार्यालयात शहारातील नागरिक  विविध कामांसाठी रोज येत असतात.

- मयुरी चव्हाण 

डोंबिवली- कल्याण  डोंबिवली महानगरपालिका आणि  येथील अधिकारी, कर्मचारी वर्ग कायम  वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. यापूर्वी केडीएमसी आयुक्त डॉ विजय  सूर्यवंशी यांनी  कल्याण येथील पालिकेच्या कार्यालयात देखील अचानक पाहणी दौरा करत कर्मचा-यांना दणका दिला होता. आता पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील प्रभाग क्षेत्र अधिकारी दहा वाजून गेले तरी  कर्मचारी आले नसल्याने विविध कार्यालयाच्या चाव्या आपल्या सोबत घेऊन एका पालिकेच्या कार्यक्रमाला  निघून गेले. यामुळे उशिरा आलेले कर्मचारी कार्यालयाबाहेर उभे होते. या सर्व गोंधळाचा फटका मात्र या ठिकाणी विविध कामांसाठी आलेल्या  नागरिकांना बसला आहे.

डोंबिवली विभागीय कार्यालयात शहारातील नागरिक  विविध कामांसाठी रोज येत असतात. मात्र अनेकदा  नागरिकांना एका कामासाठी  वारंवार कार्यालयाच्या पाय-या  झिजवाव्या लागत असल्याचही अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे कर्मचा-यांबद्दलही नागरिकांमधून अनेकदा  नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र आता पालिकेच्या अधिका-यानेच कर्मचा-यांची पोलखोल केली आहे. गुरुवारी डोंबिवली विभागीय कार्यालयात दहा वाजून गेले तरी अनेक कर्मचा-यांचा पत्ता नव्हता.  ग प्रभाग  क्षेत्र अधिकारी  संदीप  रोकडे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे त्यांनी काही आस्थापनांचे टाळे तसेच ठेवत चाव्या आपल्या सोबत घेतल्या आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला निघून गेले.

टाळे पाहून कर्मचारी सुमारे दीड तास बाहेरच उभे राहिले. एरवी निवांत असलेल्या कर्मचा-यांची  चाविचा ताबा घेण्यासाठी  आणि मस्टरवर सही करण्यासाठी एकच धावपळ उडाली.  अखेर  12 वाजण्याच्या  सुमारास टाळे उघडण्यात आले. मात्र या सर्व गोंधळाचा फटका  नागरीकांना बसलेला पाहायला मिळाला.  मात्र याचा काही परिणाम कर्मचा-यांवर  होणार का? की पुन्हा " येरे माझ्या मागल्या" हा सिलसिला सुरू राहणार   ते पाहावे लागेल. कर्मचारी उशिरा आल्याची बाब रोकडे यांनीही " लोकमत "शी बोलताना मान्य केली आहे. 

दहा वाजुन गेले तरी बहुसंख्य कर्मचारी आले नव्हते. आस्थापनांना  टाळे लागले होते. कर्मचारी वेळेत आले नसल्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला जाताना मी चाव्या सोबतच  घेऊन गेलो. कर्मचारी उशीरा आल्याचे मान्य आहे. - संदीप रोकडे, ग प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली