शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

धोकादायक इमारतीत केडीएमसीचे कार्यालय; पडझड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:29 IST

पुनर्विकास हाेणार तरी केव्हा?

डाेंबिवली:  केडीएमसीच्या डोंबिवली पूर्वेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय माजी आयुक्त गोविंद बोडके यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. महापालिकेच्या स्व-निधीतून हा विकास करणे अशक्य असल्याने, खासगीकरणातून हे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. आजतागायत कोणतीही कृती झालेली नाही. दुसरीकडे या जुन्या वास्तूत पडझड सुरूच असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर यंत्रणेला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.महापालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्षेत्र कार्यालयाची स्थापना होण्यापूर्वी या जागेवर अस्तित्वात असलेल्या इमारतीत तत्कालीन डोंबिवली नगरपालिकेचे व कालांतराने महापालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय म्हणून वापर होऊ लागला. प्रभाग क्षेत्रांची निर्मिती झाल्यानंतर डोंबिवली पूर्वेकडील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्रासाठी याच कार्यालयाचा सध्या वापर होत आहे. ही वास्तू ४० वर्षे जुनी आहे. जागेचे महत्त्व व महापालिका प्रशासकीय कामकाजाची सोय व विभागीय कार्यालयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या अनुषंगाने संबंधित ‘फ’ आणि ‘ग’ प्रभागक्षेत्र कार्यालये त्या-त्या प्रभागक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने ऑगस्ट, २०१९ मध्ये घेतला होता. ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी.पी. चेंबर तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय सुनीलनगर येथे हलविण्यात येणार होते.स्वच्छतागृहाचीही दयनीय अवस्थाविभागीय कार्यालयाच्या वास्तूत पडझड होण्याचे प्रकार सुरूच आहेत. पहिल्या मजल्यावरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या छताला असलेले पीओपी कोसळल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. ते अद्याप दुरुस्त केलेले नाही, तर एका उपअभियंत्याच्या कक्षातील पीओपीचा काही भाग कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे. या विभागीय कार्यालयामधील स्वच्छतागृहही दयनीय अवस्थेत असून, गळक्या छपरांमुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.संबंधित वास्तूचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्या संदर्भात व्हीजेटीआयला पत्रही बांधकाम विभागाने दिले आहे. यात इमारत अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट होताच, पुढील कार्यवाही केली जाईल. दरम्यान, ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पीपी चेंबरमध्ये हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.    - राजेश सावंत, प्रभागक्षेत्र अधिकारी, ‘फ’ प्रभाग

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका