शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हाताेडा

By मुरलीधर भवार | Updated: February 16, 2023 16:41 IST

कल्याण-बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा प्राधिकरण आणि कल्याण डाेंबिवली महापलिकेची फसवणूक केल्या प्रकरणातील बेकायदा इमारतीवर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालवून पाडकामाची कारवाई केली आहे. 

कल्याण-कल्याण-बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा प्राधिकरण आणि कल्याण डाेंबिवली महापलिकेची फसवणूक केल्या प्रकरणातील बेकायदा इमारतीवर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालवून पाडकामाची कारवाई केली आहे. 

महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी ही कारवाई केली आहे.  महापालिका हद्दीतील काही बिल्डरांनी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांना हाताशी धरुन महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवित रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम नाेंदणीचे प्रमाणपत्र मिळविले. रेरा प्राधिकरणास महापालिकेची फसवणूक केली. या प्रकरणातील डाेंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा येथे शिवसावली काॅम्पलेक्स या इमारतीचे मनाेज भाेईर आणि प्रफुल्ल गाेरे यांनी बेकायदा बांधकाम केले हाेते. तळ अधिक सहा मजली बेकायदा इमारतीचे स्लॅब ताेडण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्याठिकाणी २० बाय ४० आकाराचे २ फूटींगचे बेकायदा बांधकाम करण्यात आले हाेते. 

त्याचबराेबर कुंभारखान पाडा येथील बांधकामधारक सिद्धेश किर याने तळ अधिक सहा मजली बेकायदा इमारत रेरा आणि महापालिकेची फसवणूक करुन उभारली हाेती. या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पाेलिस बंदाेबस्तात ब्रेकर आणि जेसीबीच्या सहाय्याने ३० कामगार लावून करण्यात आली.

रेरा आणि महापालिका फसवणूक प्रकरणात ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात बिल्डरांच्या विराेधात डाेंबिवलीतील दाेन पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणाची चाैकशी एसआयटी आणि ईडीकडून सुरु आहे. एसआयटीने ५६ जणांची बॅक खाती गाेठविली आहेत. तसेच दहा जणांना अटक केली आहे. दहा जणांची रवानगी न्यायालयीन काेठडीत करण्यात आली आहे. एसआयटी तसेच ईडीकडून तपास सुरु असला तरी महापालिका आयुक्तांकडे ईडीकडून मागविण्यात आलेला अहवाल तयार आहे. ताे अहवाल आयुक्तांकडून सादर केला जाणार आहे. या प्रकरणात आयुक्तांसह तक्रारदार संदीप पाटील यांच्याकडूनही ईडीने माहिती घेतली आहे. तसेच काही अधिकारी वर्गाचीही चाैकशी करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील मनी लाॅण्ड्रींग करणारे ईडीच्या रडावर आहेत.

टॅग्स :kalyanकल्याण