शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकरांना मिळणार काव्यमय मेजवानी; वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 22:19 IST

       गेल्या दोन दशकांपासून कल्याण शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वात कार्यरत पू.ल. कट्टा ही संस्था कार्यरत आहे.

कल्याण- शहर, खेड, वाडीवस्ती , झोपडपट्टी आणि शहरात  आपल्या लेखणीने सर्वदूर पोहचलेले कवी म्हणजे वामनदादा कर्डक !  त्यांनी आपल्या कविता , गझल, आणि गीतांमधून  समता बंधुता न्याय ही आपल्या संविधानाची त्रिसूत्री आणि फुले- शाहू- आंबेडकर विचार खेडोपाडी पोहचवले.  गरीब कष्टकरी, कामगार, वर्गाच्या केवळ व्यस्था आणि कथाच  मांडल्या नाही तर समता, बंधुता सामाजिक न्याय टिकून राहावा म्हणून तळमळीनं लेखन केल. त्यांची  अनेक गीत समाज परिवर्तनाच्या लढ्याचे गीत बनले.  अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचे यजमानपद कल्याण शहराला मिळाले आहे.      गेल्या दोन दशकांपासून कल्याण शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वात कार्यरत पू.ल. कट्टा ही संस्था कार्यरत आहे. पु ल देशपांडे यांच्या स्मृती कल्याण नगरीत जपण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ह्या मंचाने आजवर अनेक साहित्यिक आणि सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबविले असून त्यांच्यामार्फत हा वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळा संपन्न होत आहे. 

अनेकदा कार्यक्रमानिमित्त वामनदादा अनेक वेळा कल्याण नगरीत येत असत, वास्तव्य करीत आणि आपल्या लेखणीने अनेकांना प्रेरणा देत असत. अशा या लोककवीला मानवंदना म्हणून पु.ल.कट्ट्यातर्फे हा जन्मशताब्दी हा सोहळा साजरा करण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी कल्याण नगरीतील समविचारी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर- कार्यकर्ते यांनी एकत्रित येत जन्मशताब्दी महोत्सव समिती स्थापन केली आहे. यामध्ये कवी-कथाकार किरण येले यांची जन्मशताब्दी समिती अध्यक्षपदी तर प्रा. प्रशांत मोरे यांची कार्याध्यक्षपदी तर स्वागताध्यक्षपदी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची निवड करण्यात आली आहे. 

शनिवारी १४ ऑगस्ट रोजी, या जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या प्रमूख उपस्थितीत होणार आहे. या जन्मशताब्दी सोहळ्यात वामनदादा कर्डक यांचे साहित्य आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे आमदार  भोईर यांनी सांगितले. करोना काळात सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करीत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे कार्यक्रम केले जाणार आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका