शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य दिनाची सुट्टी म्हणून कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाने ओपीडीलाही सुट्टी 

By मुरलीधर भवार | Updated: August 16, 2023 10:58 IST

ओपीडी स्वातंत्र्य दिनाच्या सुटीनिमित्त बंद असल्याने, ओपीडीत उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागले. 

मुरलीधर भवार, लोकमत न्यूज नेटवर्क. कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कल्याणमधील रुग्णालयावर जास्त ताण आहे. या रुग्णालयातील ओपीडीचा लाभ  दररोज ९०० ते १,२०० जण घेतात. मात्र, आज रुग्णालयातील ओपीडी स्वातंत्र्य दिनाच्या सुटीनिमित्त बंद असल्याने, ओपीडीत उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागले. 

स्वातंत्र्य दिनाचे ध्वजवंदन आटोपून मुख्य वैद्यकीय अधिकारी घरी गेले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ फलक लावण्यात आला होता की, स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या सुटीमुळे ओपीडी बंद राहील. उद्या (ता. १६) ओपीडी सुरू राहील. मात्र, मंगळवारी ओपीडी बंद राहील, याची कोणाला माहिती नसल्याने रुग्ण उपचारासाठी आले होते. त्यांना पुन्हा माघारी जावे लागले. 

रुग्णालयाने अपघात विभागात इमर्जन्सी ओपीडी सुरू ठेवली होती. केसपेपर खिडकीच बंद असल्याने काही रुग्ण बंद खिडकी पाहून मागच्या पावली घराकडे परतले. ज्यांनी आत जाऊन चौकशी केली, त्यांना केवळ इमर्जन्सी ओपीडीत उपचार मिळाले. इमर्जन्सी ओपीडीतही ९ ते १२ वाजेच्या दरम्यान केवळ ४० रुग्णांनी उपचार घेतले. दररोज ९०० ते १,२०० जण रुग्णालयाच्या ओपीडीचा लाभ घेतात. ही आकडेवारी पाहता, शेकडो रुग्णांना विनाउपचार परतावे लागले.

अद्ययावत आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न, पण...

महापालिकेने १ जूनला आयसीयू कक्ष सुरू केला होता. त्यात १० बेडची सुविधा होती. मात्र, दोनच दिवसांत हा कक्ष बंद करण्यात आला. खासगी एजन्सीला चालविण्यास दिल्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी असमर्थता दर्शविली. हा कक्ष बंद होऊन अडीच महिने उलटून गेले, तरी महापालिकेने कक्ष सुरू करण्याकरिता दुसरी एजन्सी नेमलेली नाही. रुग्णालयात  आयसीयूची व्यवस्था नसल्याने  रुग्णांना कळवा किंवा मुंबईतील सरकारी रुग्णालयात पाठविले जाते.

आयसीयू नसल्याने काय झाले?

आधारवाडी येथे राहणारे निनाद लोकूर (५४) हे खासगी कंपनीत कामाला होते. त्यांना ताप आल्याने त्यांनी घरीच उपचार केले. जास्त त्रास झाल्यावर त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. रुक्मिणीबाई रुग्णालयात आयसीयू कक्ष नसल्याने कळवा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना अवघ्या ३ तासांतच त्यांचा १३ ऑगस्टला मृत्यू झाला.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाhospitalहॉस्पिटल