शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी

By मुरलीधर भवार | Updated: June 5, 2024 20:35 IST

या प्रकरणी शहर प्रमुख गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कल्याणशिंदे सेनेचे कल्याण पूर्वेतील शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबूक अकाऊंटवरुन दीपक कदम नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शहर प्रमुख गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोळसेवाडीपोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पाेलिस ठाण्यात शहर प्रमुख गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या घटनेपश्चात आत्ता ही धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

द्वारली येथील जमीनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात शहर प्रमुख गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणी आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील त्यांचा मुलगा हा फरार आहे.शहर प्रमुख गायकवाड यांना गोळ्या लागल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतरत्यांनी त्यांचे राजकीय कामकाज सुरु केले. कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक

नुकतीच पार पडली. या निवडणूकीच्या प्रचारात शहर प्रमुख गायकवाड हे सक्रीय होते. दीपक कदम नावाच्या व्यक्तीने फेसबूक अकाऊंटवरुन शहर प्रमुख गायकवाड यांना धमकी दिली आहे. आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या होत्या. मी आठ गोळ्या घालीन. कदम याने शहर प्रमुक गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी येताच शहर प्रमुख गायकवाड यांनी कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन धमकी देणाऱ््या कदम याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.फेसबूक अकाऊंटवरुन जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. धमकी देणारा कदम हा व्यक्ती कोण आहे? त्याने अशा प्रकारे धमकी का दिली? या प्रकरणाचा उलगडा तपासअंती होणार आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkalyanकल्याण