शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत 1 लाख 52 हजार जणांनीच घेतले आहेत दोन डोस; लाखो चाकरमान्यांचा रेल्वे प्रवासाचा मार्ग कठीण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 19:45 IST

13 लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान

- मयुरी चव्हाण

कल्याण- कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत एकूण 5 लाख 78 हजार नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे केडीएमकडून सांगण्यात आले आहे. मात्र केडीएमसी हद्दीत आतापर्यंत  1 लाख 52 हजार नागरिकांचेच लसीचे दोन्ही  डोस घेऊन पूर्ण झाले आहे. एकूण 13 लाख नागरीकांचे लसीकरण करण्याचे केडीएमसीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे  अजूनही 11 लाख 48 हजार नागरीक लसीचे दोन्ही  डोस घ्यायचे बाकी आहेत. 

लसीचे दोन्ही  डोस घेतलेल्या नागरीकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. मध्य रेल्वेवरील  सर्वाधिक गर्दीचे आणि उत्पन्न मिळवून देणारे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक ओळखले जाते. मात्र लसीकरणाची सद्यस्थिती पाहता लाखो चाकरमान्यांचा रेल्वे प्रवास कठीण आहे हे  निश्चित झाले आहे. 

सण 2011 च्या जनगणनेनुसार  कल्याण डोंबिवली शहराची लोकसंख्या साधारण  12 लाख 50 हजार इतकी होती. 2021 साली  साधारण ही लोकसंख्या 15 लाखांच्या वर गेल्याचा अंदाज आहे. केडीएमसी हद्दीत एकूण 13 लाख नागरीकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे केडीएमसीचे उद्दिष्ट आहे. यामधून लहान वयोगटाला वगळण्यात आले आहे. केडीएमसी क्षेत्रात आत्तापर्यंत 5 लाख 78 हजार जणांचे लसीकरण झाले असून त्यामध्ये सुमारे 4 लाख 26 हजार नागरिकांचा पहिला तर 1 लाख 52 हजार नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. त्यामुळे एकूण  11 लाख 48 हजार नागरीक अजून दोन्ही  डोस घ्यायचे बाकी आहेत.       साधारणपणे जानेवारी महिन्यात कल्याण डोंबिवली क्षेत्रातील लसीकरणाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांत लसींच्या तुटवड्याअभावी वारंवार केडीएमसीची लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. मात्र, खाजगी रुग्णालयात लसींचा मुबलक पुरवठा असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे राज्य सरकारने दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. एक तर  तुटवड्याअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहे तर दुसरीकडे बोटावर मोजण्याइतकेच  लसिकरण केंद्र  सुरू असल्याने नागरिकांची केंद्रांवर मोठी गर्दी होताना दिसत आहे.

मंगळवारी सुद्धा पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात विशेषतः लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागणार हे अटळ आहे. कल्याण डोंबिवली शहरात  मध्यमवर्गीय, सुशिक्षित नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. येथील चाकरमानी कामानिमित्त मुंबई व इतर उपनगरांमध्ये येजा करतात. परिणामी  लोकल प्रवास करता यावा म्हणून नाईलाजाने  दुसऱ्या डोससाठी शुल्क भरून नागरिकांना खाजगी रुग्णालयाची पायरी चढावी लागली तर आश्चर्य वाटू नये.

एकुण 13 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये लहान वयोगटाचा समावेश नाही. -डॉ संदीप निंबाळकर,   आर .सी. एच.ऑफीसर,  केडीएमसी.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली