शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी टाटा आमंत्रा कोविड सेंटरमध्ये साजरी केली दिवाळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:23 IST

कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप : धनत्रयोदशीला साधला आनंदाचा मुहूर्त

मुरलीधर भवार     लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण :  केडीएमसी हद्दीत मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा कहर ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी कमी होऊ लागला. ही एक समाधानकारक बाब पाहता आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी साजरी केली.

कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी दिवसरात्र झटणारे डॉक्टर, नर्स, वाॅर्डबॉय, कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप दिली. या त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देत त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा केल्याने दिवाळीत सर्व कर्मचारी व रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.सर्व जण आपल्या घरात दिवाळी साजरी करणार होते. मात्र, कोरोना सेंटरमध्ये दिवाळी साजरी करण्याचा आणि कर्तव्य बजावताना वेगळा आनंद डॉक्टर आणि नर्स यांना होता. त्याहीपेक्षा जास्त आनंद कोरोना सेंटरमधील रुग्णांना झाला होता. कारण, ते दिवाळीत घरी जाणार नव्हते. मात्र, या कार्यक्रमामुळे त्यांनाही दिवाळी घरीच साजरी करीत असल्याची जाणीव झाली.

संस्मरणीय दिवाळी दिवाळीत आम्ही कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी या ठिकाणी आमच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सचा सत्कार करण्यात आला. ही आमच्या आयुष्यातील एक आगळीवेगळी आणि संस्मरणीय दिवाळी ठरली, असे रुग्ण पुषपा म्हात्रे यांनी सांगितले.

 कर्तव्य बजावताना सेंटरमध्ये ६७ डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसह अधिकारी होते. मात्र, धनत्रयोदशीच्या दिवशी आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली. ही बाब आमच्यासाठी मोठी होती.          - डॉ. दीपाली मोरे,    वैद्यकीय अधिकारी, टाटा आमंत्रा

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या