शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : तिकीटाच्या रांगेत उभ्या असलेल्या तरुणाला दलालांकडून मारहाण

By मुरलीधर भवार | Updated: May 23, 2023 18:13 IST

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

कल्याण-कल्याण रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर तिकीटाच्या रांगेत उभ्या असलेल्या तरुणाला दलालांकडून काल रात्री मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेमुळे कल्याण रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रात दलालांकडून दादागिरी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दलालांची मजल आत्ता मारहाण करण्यापर्यंत गेली आहे.

काल एका माथेफिरूने एका तरुणीला मिठी मारल्याचा प्रकार घडल्यानंतर महिला प्रवासी सुरक्षित नसल्याची बाब समोर आली असता आत्ता दलालांची दादागिरी समोर आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट आरक्षणाकरीता कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट आरक्षण केंद्रावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. कोकण रेल्वेने कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग एका मिनिटात फुल्ल झाल्याने दलालांकडून तिकीट बुकींगकरताना काळा बाजार केला जातो हे समोर आले. परराज्यातील लोक सुट्टीत गावी जाण्याकरीता तिकीटासाठी रांग लावतात. त्यांना सहजासहजी तिकीट मिळत नाही. अनेकदा दिवसभर तिकीटाच्या रांगेत उभे राहून तिकीट मिळत नाही. त्याकरीता रात्री १२ वाजल्यापासून तिकीटासाठी रांग लावली जाते. तात्काळ तिकीट मिळविण्याकरीता दलालांकडून तिकीटासाठी रांग लावली जाते.

तिकीट खिडकीद्वारे आरक्षण सुरु होताच दलाल तिकीट खिडकीभोवती एकच गर्दी करतात. कल्याणहून बनारसला जाण्यासाठी तिकीटाच्या रांगेत संतोष राय नावाचा तरुण उभा होता. हा तरुण सलग तीन दिवस आरक्षण केंद्राच्या रांगेत होता. पहिल्या दिवशी त्याचा नंबर ५० वा होता. त्याला तिकीट मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा नंबर ११ वा होता. काल रात्री तो रांगेत उभा असताना काही जण त्याठिकाणी आले. त्यांनी रांग लावली नव्हती. ते थेट रांगेत घुसले. त्याला संतोष याने विरोध केला. रांग तोडत असल्याचा व्हिडीओ त्याने काढण्याचा प्रयत्न केला. दलालांनी त्याला मारहाण केली. त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमधील व्हिडीओ डिलीट केला. या घटनेची तक्रार संतोष यांने रेल्वे पोलिस ठाण्यात केली आहे.

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी संतोष यांची तक्रार प्राप्त झाली असून या घटनेची गंभीर दखल घेऊन मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. दरम्यान आरपीएफ जवान यांनी घडलेली घटना मान्य करीत कठाेर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

दरम्यान कोकण रेल्वेतील तिकीट आरक्षणात झालेल्या गडबडीबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहार करुन कारवाईची मागणी केली होती. आत्ता मनसे आमदार पाटील यांनी तिकीट आरक्षण केंद्रावरील तरुणाच्या मारहाण प्रकरणी दलालांच्या विरोधात कारवाई करुन तिकीट आरक्षण केंद्र दलालमुक्त करावे अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण