शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शेकडो ठिकाणी योगदिन साजरा; नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

By अनिकेत घमंडी | Updated: June 21, 2024 16:28 IST

नरेंद्र पवार फाऊंडेशन- पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने ६८ ठिकाणी आयोजन.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून नरेंद्र पवार फाऊंडेशन आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिमेत शुक्रवारी ६८ ठिकाणी योगदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. माजी आमदार पवार यांच्या पुढाकाराने कल्याणात प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात योग दिनाचे साजरा केल्याची सर्वत्र चर्चा होती. ज्यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. कल्याणमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून पश्चिमेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम टिटवाळापर्यंत योगदिनाचे कार्यक्रम करण्यात आली. येथील काही प्रमुख ठिकाणांसह कल्याण पश्चिमेतील विविध शाळांमध्येहीही योग दिन साजरा करण्यात आला. या योगदिनासाठी आवश्यक ते सर्व साहित्य आणि योग शिक्षक हेदेखील नरेंद्र पवार फाऊंडेशन आणि पतंजली योग समितीतर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते.

यापैकी काही ठिकाणच्या कार्यक्रमांत पवार यांनीही सहभागी होत नागरिक आणि विद्यार्थ्यांसह योगासनंही केल्याचे दिसून आले. मनुष्याच्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून आज योग आणि योगासनांना संपूर्ण जगभरात मान्यता मिळाली असल्याची भावना पवार यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आज प्रत्येक जण आधुनिक जीवनशैलीमुळे उद्भवलेल्या विविध आजारांनी त्रस्त आहेत. या विकारांवरील रामबाण उपाय हा योगच असून प्रत्येकाने योगसाधना करणे गरजेचे असल्याचे सांगत पवार यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. आणि रोज नियमित योगसाधना करण्यासाठी आवाहन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि पतंजली योग समितीच्या सर्व पदाधिकारी - सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. 

डोंबिवलीतही योग विद्याधाम नाशिक या संस्थेच्या डोंबिवली सेंटरच्या माध्यमातून रामनगर येथे सकाळी योग दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी संस्थेचे संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन