शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

थकीत मालमत्ता प्रकरणी दावा दाखल, केडीएमसीकडून २७ हजार ९७३ जणांना नोटिसा

By मुरलीधर भवार | Updated: August 31, 2023 18:44 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी थकविणारे अनेक थकबाकीदार आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी थकविणारे अनेक थकबाकीदार आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लाेक अदालत आयोजित केली आहे. या लाेक अदालतीमध्ये एकूण २७ हजार ९७३ दावा दाखल पूर्व प्रकरणे ( प्री लिटिगेशन मॅटर्स ) घेण्याकरीता न्यायालयाच्या सही शिक्क्यासह नोटिसा तयार करण्यात आल्या असून त्या संबंधितांना महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाकडून पाठविण्याचे काम सुरु असल्याची माहिती मालमत्ता कर वसूली विभागाचे उपायुक्त विनय कुळकर्णी यांनी दिली आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांचे सूचनेनुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांचे आदेशानुसार तिसरी राष्ट्रीय लोक अदालत ९ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. या लोक अदालतीपूर्वी दावा दाखल करणाऱ््यांना नोटिसा पाठविल्या जाणार आहेत.थकीत कर वसूलीच्यासाठी महापालिकेने १५ जून रोजी अभय योजना लागू केली. थकीत रक्कमेपैकी २५ टक्के रक्कम एकरकमी भरल्यास ७५ टक्के दंडाची आणि व्याजाची रक्कम माफ करण्यात येत आहे. सुरुवातीला ही अभय योजना ३१ जुलै पर्यंत होती. त्याची मुदतवाढ करुन ती १८ आ’गस्टपर्यंत करण्यात आली.

१८ आगस्ट पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत अभय योजनेच्या माध्यमातून १७५ कोटीची माया जमा झाली होती. पुन्हा या योजनेला मुदतवाढ दिली गेली. ३१ आ’गस्टपर्यंत मुदत होती. आजच्या तारखेत अभय योजनेतून एकूण २०४ कोटी सात लाख रुपये झाले आहेत. १८ ते ३१ आ’गस्ट दरम्यान २९ कोटी ७ लाख रुपये थकबाकी दारांनी भरले आहे. आत्तापर्यंत ४३ हजार ९९३ थकबाकीदारांनी या अभय योजनेचा लाभ घेतला आहे.

दावा दाखल पूर्व प्रकरणातील २७ हजार ९७३ जणांना महापालिकेच्या अभय योजनेचा लाभ घेता यावा यासाठी पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. कारण ९ सप्टेंबर रोजी लोक अदालत आहे. ही लोक अदालत यशस्वी होण्यासाठी ही मुदतवाढ दिली गेली असल्याचे उपायुक्त कुळकर्णी यांनी सांगितले.