शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबवलीमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान संपन्न

By अनिकेत घमंडी | Updated: March 1, 2023 17:11 IST

महाराष्ट्र भूषण तिर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बुधवरीबकल्याण पश्चिम येथे महास्वच्छता अभियान संपन्न झाले.

डोंबिवली:

महाराष्ट्र भूषण तिर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बुधवरीबकल्याण पश्चिम येथे महास्वच्छता अभियान संपन्न झाले.संपूर्ण कल्याण, डोंबिवली शहरं स्वच्छ करण्यात आले, त्याची सुरुवात कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली. तसेच न्यायालय व तहसील कार्यालय परिसरातही स्वच्छता करण्यात आली. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त सामाजिक उपक्रम म्हणून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे आदर्श आणि सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी नेहमी सक्रिय असते, सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये जलसंधारण, जलयुक्त शिवार पासून अनेक उपक्रमांचा समावेश आहे. प्रतिष्ठानचे सामाजिक योगदान अभूतपूर्व असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उत्तरेकडील गेटच्या  बाजूला असलेल्या विहिरीला मुबलक पाणी असून ते स्वच्छ करून, उपसा काढून, गाळ काढून देण्याची विनंती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांना श्री सदस्यांनी केली, त्यांनी ते स्वच्छ करून देण्याचे सांगितले आहे. जेणेकरून त्या विहिरीच्या पाण्याचा उपयोग स्वच्छतागृह व झाडांना होईल. न्यायालयाच्या परिसरामध्ये पक्षकारांसाठी असलेले स्वच्छतागृह मोठे असून पाण्याअभावी त्या ठिकाणी दुर्गंधी आहे. विहिरीचा पाण्याचा उपयोग करून ते वापरात आणले जाईल आणि स्वच्छताही राहील अशी मागणी केली.यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त अतुल पाटील, दिवाणी वकील संघटनेचे उपाध्यक्ष रासकर, तसेच ॲड. बोंद्रे , कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष  ॲड.प्रकाश जगताप, ग्रंथपाल ॲड. भरत पाटील, कल्याण शहर बैठकीतील श्री सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोंबिवलीतही श्री सदस्यांनी शहरात इंदिरा गांधी चौक ते नांदीवली, एमआयडीसी भाग, ठाकुर्ली, फडके पथ, पश्चिमेला बावनचाल, सुभाष।रोड, महात्मा फुले रोड, घनश्याम।गुप्ते, पंडित दीनदयाळ पथ, कोपर आदी भागात स्वच्छता अभियान राबवले.