शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये २ झोंबी! कोरेक्स औषध न दिल्याने मेडिकलमध्ये घातला राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 15:24 IST

कल्याणजवळ बनेली येथील घटना, मेडिकलची केली तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद 

कल्याण - अलीकडेच प्रदर्शित झालेला झोंबिवली हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. नशेच्या आहारी गेलेले तरूण एकमेकांच्या जीवावर उठतात. नशेसाठी कासावीस झालेले नशेखोर कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. कल्याणमध्ये घडलेल्या या घटनेने हीच प्रचिती तुमच्यासमोर येईल. कल्याणजवळ असलेल्या बनेली परिसरात मेडिकल चालकाने विना डॉक्टर प्रिस्क्रिप्शन कोरेक्स औषध देण्यास नकार दिल्यानं २ नशेखोर तरुणांनी मेडिकलची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

नशेखोर तरुणाचा हा थयथयाट सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. रात्रीच्या सुमारास हे दोन तरुण बनेली  परिसरात डॉ.आंबेडकर चौक येथील वेलकम मेडिकलमध्ये आले. त्यांनी मेडिकल चालकाकडे कोरेक्स औषध मागितले. मेडिकल चालकाने डॉक्टरच्या परवानगी शिवाय हे औषध देऊ शकत नाही सांगत डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणण्यास सांगितले. मात्र हे नशेखोर ऐकण्यास तयार नव्हते. त्यांनी पुन्हा औषधाची मेडिकल दुकानदाराकडे मागणी केली मात्र मेडिकल चालकाने औषध देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या या दोन्ही नशेखोर तरुणांनी  मेडिकल चालकाला ठोशाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळी केली. दोघे इथेच थांबले नाहीत तर मेडिकलचं काऊंटर  व  दोन फ्रिज ढकलून देत तोडफोड केली. काऊंटरवरील औषधे अस्त व्यस्त केली या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नशेखोरानी कोरेक्स औषधासाठी केलेल्या धिंगाण्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.