शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा; कर्मचाऱ्यांसह कुटुंबियही सहभागी

By अनिकेत घमंडी | Updated: June 7, 2024 16:34 IST

डोंबिवली महावितरणच्या कल्याण परिमंडलात महावितरणचा १९ वा वर्धापन दिन गुरुवारी  उत्साहात साजरा झाला.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: महावितरणच्या कल्याण परिमंडलात महावितरणचा १९ वा वर्धापन दिन गुरुवारी  उत्साहात साजरा झाला. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, अभियंते, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

महावितरणच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल, कल्याण एक आणि दोन तसेच कल्याण स्थापत्य मंडलांतर्गत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुषांच्या संयुक्त जंयती महोत्सवाची परंपरा सलग तिसऱ्या वर्षी कायम ठेवताना लेखक जगदिश ओहोळ यांचे व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाले. तर त्यानंतर ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या व्यावसायिक नाटकाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे निखळ मनोरंजन करताना त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.

या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते अनिल घोगरे, निलकमल चौधरी, संदिप पाटील, विजय मोरे, दीपक पाटील, दिलीप भोळे, संजय खंडारे, दिलीप खानंदे, महेश अंचिनमाने, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप महाव्यवस्थापक योगेश खैरनार, हविषा जगताप, उपसंचालक सुमीत कुमार, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंते, उपविभागीय व शाखा अभियंते, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य लिपिक गणराज वाळींबे यांनी केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीmahavitaranमहावितरण