शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

"कल्याण- शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: July 6, 2024 15:17 IST

हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे.

कल्याण : कल्याण-शिळ रस्त्यावर कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहेत. हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे.

कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी पर्यायी रस्ते उपलब्ध करुन द्यावेत. हे काम तळोजापासून सुरु करण्यात यावे. कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंंट कॉंक्रिटीकरणापैकी ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम भूसंपादन अभावी रखडले आहे. रस्ते बाधितांना ३०० कोटी रुपयांचा मोदबला देणे बाकी आहे. हा मोबदला तातडीने देऊन रस्ते विकासाचे रखडलेले काम मार्गी लावावे. २७ गावांची नगरपालिका करण्याचा विषय न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असले तरी २७ गावांपैकी महसूली उत्पन्न देणारी ९ गावे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात ठेवली आहेत. याशिवाय १४ गावे वगळून ती नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली आहे. २७ आणि १४ गावांप्रकरणी सरकारकडून ठाेस भूमिका घेतली जात नाही. २७ गावात एमएमआरडीए आणि म्हाडा यांच्याकडून गृह संकुले उभारली जात आहे. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघाचा काही भाग ठाणे , कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येतो. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि प्राधिकरणाकडून विकास कामांचे नियोजन शून्य आहे. २७ गावात अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या कामात समन्वयाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यासह गटारांची कामे केले आहे. ती पुन्हा खोदून करावा लागत आहेत. डोंबिवली जिमखान्यासमाेरचा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या तीन महिन्यात तो रस्ता खोदावा लागला. तो पुन्हा केला जात आहे. मात्र अशा प्रकारे बेजबादारपणे काम करणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रस्त्यांच्या कामांना कोणत्याही प्रकारचा दर्जा राहत नाही. त्यामुळे ठाणे आणि कल्याण डाेंबिवली महापालिका ह्द्दतील रस्त्यांच्या कामांचे ऑडिट करण्यात यावे.अमृत पाणी पुरवठा योजना ही पाणी विरतण व्यवस्था समक्ष करण्यासाठी आहे. या योजनेचे काम विहित वेळेत पूर्ण झालेले नाही. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपैकी काही गावात पाणी टंचाईचा प्रश्न आहे. त्यामुळे नागरीकांकडून आंदोलने केली जात आहेत याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणRaju Patilराजू पाटीलvidhan sabhaविधानसभा