शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तोतया ड्रग इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई करावी, केमिस्ट संघटनेची पोलिसांकडे मागणी

By अनिकेत घमंडी | Updated: July 6, 2023 15:23 IST

पोलिसांनी तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन डोंबिवली मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांना दिले.

डोंबिवली - शहरातील केमिस्ट बांधवांना फोनवर धमकावून ऑनलाइन पैसे उकळणाऱ्या तोतया ड्रग इन्स्पेक्टर वर कारवाई करावी अशी मागणी डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे वतीने पोलिसांना केली आहे. याबाबत चे निवेदन आणि फसवणुकीचे पुरावे पोलीस निरीक्षक ( प्रशासन ) श्सुरेश मदने , पोलीस हवालदार मंदार यादव मानपाडा पोलीस स्टेशन डोंबिवली पुर्व यांच्याकडे सादर केले. यावेळी डोंबिवली असोसिएशनकडून दिलीप देशमुख, राजेश कोरपे, निलेश वाणी, शिवाजी आव्हाड, दिनेश यादव उपस्थित होते.

डोंबिवली शहरातील मेडिकल दुकान मालकांना मी ड्रग इन्स्पेक्टर बोलतोय असा फोन करून तुमच्या कडून घेतलेल्या औषधांमुळे एकाची प्रकृती गंभीर झालेली आहे, तुमची ऑनलाइन तक्रार आलेली आहे. आपले दुकानावर निलंबनाची कारवाई करावी लागेल दुकान सिज होईल अश्या प्रकारची बतावणी करून प्रथम दुकानदारांना घाबरविले जाते. नंतर आपण उपचारासाठी तात्काळ पैसे पाठवा मगच प्रकरण थांबवता येईल असे सांगून ऑनलाइन हजारो रुपये उकळले जात आहेत. 

डोंबिवली शहरातील अनेक केमिस्ट दुकानदारांना अश्या प्रकारे फोन आले आहे. याबाबत चे सर्व पुरावे पोलिसांकडे केमिस्ट संघटनेने सादर केले. तोतया ड्रग इन्स्पेक्टर ची एक टोळी असल्याची शंका व्यक्त केली जात असून लाखो रुपयांची लूट यांनी केली असल्याचे लक्षात येत आहे. असे प्रकार पश्चिम महाराष्ट्रात देखील झालेले आहे. पुणे एफडीए विभागाने काढलेले परिपत्रक देखील पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.  पोलिसांनी तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन डोंबिवली मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांना दिले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली