शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मी नेता हाेण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी राजकारणात आलो; रोहित पवारांची भाजपसह काकांवर टिका

By मुरलीधर भवार | Updated: September 22, 2023 22:01 IST

नेता होण्यासाठी आलो नाही असा टोलाही त्यांनी त्यांचे काका अजित पवार यांना लगावला आहे.

कल्याण- काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी रोहित पवार हे अजून पाळण्यात आहेत अशी टिका केली होती. त्या टिकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी मी राजकारणात विचार जपण्यासाठी आलो आहे. नेता होण्यासाठी आलो नाही, असा टोलाही त्यांनी त्यांचे काका अजित पवार यांना लगावला आहे.

भाजपने केलेले सर्वेक्षणाचे रिपोर्ट हे भाजपची परिस्थिती ठिक नसल्याचे दाखवित आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यानंतरही भाजपची स्थिती सुधारत नाही. हे पाहता भाजपने शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला. सत्तेसाठी ही फोडाफोडी करुन देखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही अशी टिका रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. कल्याण येथील स्प्रींग टाईम हा’टेलच्या सभागृहात इंडिया आघाडीच्या सभेचे आयोजन आज करण्यात आले होते. या प्रसंगी युवा नेते आमदार पवार यांनी भाजपसह त्यांच्या काकांवर टिका केली. या सभेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह पदाधिकारी वंडार पाटील, संदीप देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे, का’ंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, आम आदमीचे धनंजय जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.

युवा नेते पवार यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. त्यांचे चिरंजीव खासदार आहे. शिवाय या भागात भाजपचे खासदार केंद्रीय मंत्री आहेत. याठिकाणच्या जनतेशी गप्पा मारल्यावर कळाले की याठिकाणी विकास झालेला नाही. या भागात आराेग्याच्या वाहतूक कोंडीच्या समस्या आहेत. महिलांवर हल्ले होता. रस्ते खराब आहे.

युवा नेते पवार यांनी सांगितले की, वांद्रे येथून कल्याणच्या सभेला येण्यासाठी निघालो. तेव्हा गुगलवर वाहतूकीची स्थिती जाणून घेतली. तेव्हा गुगल महाशयांनी तीन तास लागणार असे सांगितल्यावर मी रेल्वे ट्रेनने कल्याणला येणे पसंत केले. कल्याणला आल्यावर एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्यासाठी महाल ४५ मिनीटे लागली. तर परत सभेच्या ठिकाणी पोहचण्याकरीता अर्धा तास लागला.