शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अजून किती काळ कामगारांचे जळालेले तुकडे गोळा करणार? कामगार भेदरले, नागरिक संतापले

By अनिकेत घमंडी | Updated: June 13, 2024 13:53 IST

Dombivali MIDC News: जगार मिळण्याच्या आमिषाने आम्ही इथे आलो, पण इथे रोजच मृत्यूची टांगती तलवार कायम आहे, शिक्षण कमी, घरच्या जबाबदाऱ्या आणि सतत स्फोट, आगीशी खेळ अशा वातावरणामुळे खूप भीती वाटते, अशा शब्दांत इंडो अमाईन कंपनीतील घाबरलेल्या कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - रोजगार मिळण्याच्या आमिषाने आम्ही इथे आलो, पण इथे रोजच मृत्यूची टांगती तलवार कायम आहे, शिक्षण कमी, घरच्या जबाबदाऱ्या आणि सतत स्फोट, आगीशी खेळ अशा वातावरणामुळे खूप भीती वाटते, अशा शब्दांत इंडो अमाईन कंपनीतील घाबरलेल्या कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एमआयडीसीतील कंपन्यांना किती केमिकल साठा करण्याची परवानगी आहे? त्यांनी किती साठा करून ठेवलाय यावर कुणाचेच नियंत्रण नाही का, असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत.

वीस दिवसांपूर्वी अंबर(अमुदान) कंपनीत स्फोट झाला. आता इंडो अमाईनमध्ये आग लागली हे आणखी किती दिवस चालणार? यावर काही तोडगा आहे की नाही? सगळा अनागोंदी कारभार असाच सुरू राहणार? हे कारखानदार पैसेवाले आहेत त्यामुळे त्यांना लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कुणी दिला? असा संतप्त सवाल जमलेल्या नागरिकांनी केला. अमुदान स्फोटात ज्यांच्या घरांचे खूप नुकसान झाले, त्यापैकी काही महिलांना बुधवारी रडू कोसळले.

पुन्हा स्थिती जैसे थेराजकीय पक्ष, शासन काही करत नाही, फक्त अपघात झाला की येतात आणि घोषणा करून जातात, पुन्हा स्थिती जैसे थे. शासकीय यंत्रणाही एकामागून एक येतात. सामान्यांच्या जीवाचे कोणाला काही पडलेले नाही, ही शोकांतिका आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.नोकरी करणे झाले कठीण     कामगार रोजीरोटीसाठी येतात आणि त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. वर्षानुवर्षे असेच सुरू आहे. आगीचे लोळ, धूर दिसल्याने इंडो अमाईनमधील कामगार निदान बाहेर पळाले.      बॉयलर किंवा रिॲक्टरचा स्फोट झाला तर आतल्या आत किती गेले त्याचा पत्ता लागत नाही. नंतर जळलेले मांसाचे तुकडे गोळा केले जातात, अशी भावना एका कामगाराने व्यक्त केली. येथे नोकरी करणे कठीण झाल्याची खंत त्याने व्यक्त केली. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी