शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

KDMC तून गावे वगळण्याची सुनावणी पुढे ढकलली

By मुरलीधर भवार | Updated: May 15, 2023 23:07 IST

महापालिकेतून २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा प्रस्ताव

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी हाेती. मात्र या प्रकरणी राज्य सरकार आणि महापालिकेने मुदतवाढ मागितल्याने आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

२७ गावे २०१५ साली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. ही गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याची मागणी असताना गावे महापालिकेत का समाविष्ट केली असा सवाल उपस्थित केला. २७ गावे महापालिकेतून वगळण्यात यावी अशी मागणी करीत तत्कालीन राज्य सरकारच्या निर्णयास सर्व पक्षीय संघर्ष समितीने जाेरदार हरकत घेतली. त्यामुळे ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी या मागणीवर शिवसेना भाजप सरकारने निर्णय घेतला नाही. ही बाब झुलवत ठेवली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडी सरकारने २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याची अधिसूचना काढली. तसेच १८ गावे वगळण्यात आली त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठीही अधिसूचना काढली. या दोन्ही अधिसूचनांना उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने न्यायालयाने स्थगिती आदेश दिले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी क’व्हेट दाखल केले. त्यावर न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकेस जाब विचारला होता. गेल्या सहा महिन्यापासून या प्रकरणात मुदत वाढवून घेतली जात आहे. आज या प्रकरणावर सुनावणी होती. मात्र राज्य सरकारने या प्रकरणी २ आवठवड्याची तर महापालिकेने ४ आठवड्याची मुदत वाढ मागितली आहे. ही मुदतवाढ मागितल्याने आज ची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर पुढील सुनावणीची तारीख मिळू शकते अशी माहिती याचिकाकर्ते पाटील यांनी दिली आहे. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात १८ गावे वगळणे आणि त्यांची स्वतंत्र नगरपालिका करणे या दोन्ही अधिसूचनाना रद्द करुन वगळलेली गावे महापालिकेत समाविष्ट असावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका