शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीला हेल्थ केअर हिरोज राष्ट्रीय पुरस्कार

By मुरलीधर भवार | Updated: September 10, 2022 20:07 IST

५२ नामांकनामधून केडीएमसीला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने गेल्या दोन वर्षात महापालिकेसह आसपासच्या परिसरात विविध नाविन्यपूर्ण आणि लोकोपयोगी उपक्रम राबविल्याने राष्ट्रीय स्तरावरील म्यून्सिपल एक्सलन्स अॅवार्डप्राप्तीसाठी ५२ नामांकनामधून केडीएमसीला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदरभार डॉ. विजय सूर्यवंशी स्विकारल्यानंतर कामाला सुरुवात केली. लगेच कोविड जागतीक महामारीचे संकट जगावर कोसळले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आरोग्य सेवा अपुरी असताना

कोविडवर मात करण्यासाठी आयुक्तांसह प्रशासनाने जी मेहनत घेतली. त्याची दखल घेत केंद्र सरकारने कोविड इन्व्होशन हा प्रथम पुरस्कार कल्याण डोंबिवली महापालिकेस दिला. आयुक्त सूर्यवंशी यांनी महापालिका हददीत 9 वाढीव शहरी आरोग्य केंद्रे सुरु केली. कोरोना काळात रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. रुग्णालये उभारली. खाजगी आरोग्य सेवा आणि डॉक्टर आर्मिची मदत घेतली.

पिवळी व भगवी शिधापत्रिका मोफत तर पांढरी शिधापत्रिका धारक असलेल्याना आणि नसलेल्या गरजूंना ८४९ रुपयांमध्ये डायलिसीस सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कॅथ लॅब आणि कॅन्सर रेडीओथेरपी केंद्र सुरु करण्यात आले आहे. पिवळया व भगव्या शिधापक्षत्रिका धारकांना मोफत तर पांढरी शिधापत्रिका असलेल्या माफक दरात उपचार सुविधा दिली आहे. कल्याणच्या वसंत व्हॅली येथे प्रसूती केंद्र सुरु केले. डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पीपीपी तत्वावर एमआरआय, सिटी स्कॅन, रेडिअेालॉजी या सेवा माफक दरात सुरु करण्यात आलेल्या आहेत.

लहान मुलांसाठी अतिदक्षता कक्ष सुरु केला आहे. कल्याणमधी रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यात आलेल्या आहेत. गौरी पाडा येथे कोरोना टेस्टींग लॅब सुरु केली. तसेच फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कोरोना काळात सुरु केली. या सगळ्य़ा कामाची दखल घेत म्युन्सीपल एक्सलन्स हेल्थ केअर हिरोज हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. चार लाख रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.