शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांची साधी भेटही न घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:36 IST

उल्हास नदीचे प्रदूषण : जगन्नाथ शिंदे यांनी केली चर्चा

कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘मी कल्याणकर’ संस्थेच्या वतीने नदीपात्रात सुरु असलेल्या आंदोलनास भेट न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी निषेध केला आहे.संस्थेच्या वतीने नितीन निकम यांच्या पुढाकाराने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर आणि कैलास शिंदे हे आंदोलन करीत आहे. हे आंदोलन दिवसरात्र नदीपात्रात सुरु आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या प्रकरणी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या प्रकरणी काय तोडगा काढता येईल याविषयी विचारणा केली. त्यावर अधिकारी त्याठिकाणी येणार नाही. चर्चेकरिता आंदोलन करणाऱ्यांनी महापालिकेत यावे असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले. या उत्तराने शिंदे संतप्त झाले. त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला न येणाऱ्या अधिकारी वर्गाचा निषेध व्यक्त केला. महापालिकेस शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने आता १५ फेब्रुवारी रोजी शिंदे शहर अभियंत्याना भेटून या संदर्भात चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर आयुक्तांचीही भेट मंगळवारी घेणार आहेत. त्यामुळे सुरु असलेले आंदोलन तूर्तास तरी सुटण्याचा काही एक मार्ग नाही. आंदोलन करणाऱ्यांनीही ठोस उपाययोजना केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता नदी प्रदूषण रोखण्यासाठी काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.