शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत मीटर बायपास करून जीम चालकाने केली ९ लाखांची वीजचोरी; गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 18:11 IST

गेल्या १४ महिन्यात जीमसाठी ९ लाख ६ हजार २२० रुपयांची ४७ हजार १५८ युनिट वीज चोरण्यात आल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.

कल्याण - कल्याण पूर्व विभागातील नांदिवली शाखेंतर्गत देसलेपाडा येथे ‘डी फिटनेस क्लब’ च्या जीम चालकाने मीटर बायपास करून तब्बल ९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे महावितरणच्या पथकाने उघडकीस आणले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जीमच्या जागेचा मालक व चालकाविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघु पुजारी (चालक) व हेमंत पाटील (मालक) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. देसलेपाड्यातील वरद विनायक रेसिडेन्सीच्या तळमजल्यावर असलेल्या ‘डी फिटनेस क्लब’ या जीमच्या वीजपुरवठ्याची तपासणी महावितरणच्या पथकाने केली. मीटरकडे येणाऱ्या केबलला लाकडी फळीच्या आतून दुसरी केबल जोडून जीमसाठी परस्पर वीजवापर सुरू असल्याचे पथकाच्या तपासणीत आढळून आले. गेल्या १४ महिन्यात जीमसाठी ९ लाख ६ हजार २२० रुपयांची ४७ हजार १५८ युनिट वीज चोरण्यात आल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. सहायक अभियंता रविंद्र नाहिदे यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात पुजारी आणि पाटील यांच्याविरुद्ध वीजचोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.    कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता पद्माकर हटकर, सहायक अभियंते रविंद्र नाहिदे, योगेश मनोरे, प्रशांत राऊत, वर्षा भांगरे, प्रधान तंत्रज्ञ जगदीश धमक, तंत्रज्ञ गणेश अहिर, राजेंद्र करनवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली.