शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह; ढोल ताशे, लेझीम, भजनाच्या गजरात स्वागत यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 10:07 IST

कल्याण -   हिंदू नववर्षानिमित्त  स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते . मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्वागतयात्रा रद्द झाल्या होत्या ...

कल्याण -   हिंदू नववर्षानिमित्त  स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते . मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्वागतयात्रा रद्द झाल्या होत्या .यंदा सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर आज ठिकठिकाणी स्वागत यात्रा आयोजित करण्यात आल्या.

कल्याण पूर्वेत  देखील स्वागत यात्रेला पंधरा वर्षांची परंपरा आहे. आज कल्याण पूर्वेत हिंदू नववर्ष समितीच्या वतीने स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती . आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते गुढी पूजन करून स्वागत यात्रेला सुरुवात झाली. या स्वागत यात्रेत तरुण-तरुणींचा नागरिकांचा उत्साह दिसून आला .गणपती मंदिरापासून ते आई तिसाई मंदिरापर्यंत या यात्रेचा मार्ग आहे .या स्वागत यात्रेमध्ये तरुण-तरुणी ,नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते ,ढोल ताशे लेझीम पथक ,वारकरी ,घोडयावर स्वार झालेल्या महिला ,बालशिवाजी  देखील या यात्रेत सहभागी झाली होती. या यात्रेत देवीदेवतांच्या वेशभूषा करून काही तरुण तरुणी सहभागी झाले होते  .त्याचप्रमाणे महिला रिक्षाचालक ,सायकल रॅली ,बाईक रॅली देखील काढण्यात आली होती .

यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी यंदा निर्बंध शिथिल झाल्याने उत्साह आहे मात्र सरकारने निर्णय उशीरा घेतला ,लवकर घेतला असता तर स्वागत यात्रा आणखी व्यापक प्रमाणात काढता आली असती अशी खंत व्यक्त केली