शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता, खासदार श्रीकांत शिंदे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 07:44 IST

Shrikant Shinde : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण डॉक्टर आर्मी या कार्यक्रमाला डॉ. शिंदे उपस्थित होते.

कल्याण : केडीएमसीतून १८ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निकाल दिला आहे. या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार जाऊ शकते, असे मत कल्याणचे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मांडले आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण डॉक्टर आर्मी या कार्यक्रमाला डॉ. शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांना १८ गावांच्या निकालासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी उपरोक्त मत मांडले. कल्याण-डोंबिवलीतील १८ गावे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र काही याचिकाकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय व गावे वगळण्याची प्रक्रिया रद्द ठरविली. शिंदे यांना याविषयीची भूमिका विचारली असता, त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात काही होऊ शकते का, याचा विचार सरकारी स्तरावर केला जाऊ शकतो. 

सर्वपक्षीय संघर्ष समितीही आक्रमकसर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक रविवारी मानपाडा येथील मानपाडेश्वर मंदिरात पार पडली. या बैठकीस समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, वंडार पाटील, गगाजन मांगरुळकर, दत्ता वझे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीपश्चात समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी समितीने लावून धरली होती. विद्यमान सरकारने २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याची प्रक्रिया सुरु केली असताना, न्यायालयाने सरकारच्या प्रक्रियेस रद्दबातल ठरविले आहे. वास्तविक, १९८३ साली गावे महापालिकेत घेतली, तेव्हा आणि ही गावे २००२ साली वगळली तेव्हादेखील पालिकेने कोणताही ठराव केला नव्हता. ही गावे पुन्हा २०१५ साली महापालिकेत समाविष्ट केली गेली तेव्हाही ठराव केला नव्हता. मग न्यायालयाने आताच हा मुद्दा ग्राह्य धरुन त्याआधारे निकाल दिला.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याण