शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

मोबाईल क्रमांकाच्या नोंदणीतून घरबसल्या मिळवा विजेसंदर्भात सर्व माहिती

By अनिकेत घमंडी | Updated: October 6, 2023 17:09 IST

कल्याण परिमंडलात कृषिपंप ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर असे एकूण २८ लाख १० हजार वीज ग्राहक आहेत.

डोंबिवली - महावितरणकडे मोबाईल क्रमांकांची नोंदणी करणाऱ्या वीज ग्राहकांना मीटर रिडींग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती 'एसएमएस'द्वारे पाठविण्यात येते. कल्याण परिमंडलातील २४ लाख ३६ हजार म्हणजेच ८७ टक्के ग्राहकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवले आहेत. उर्वरित ग्राहकांनीही आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कल्याण परिमंडलात कृषिपंप ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर असे एकूण २८ लाख १० हजार वीज ग्राहक आहेत. यातील जवळपास ८७ टक्के ग्राहक मोबाईल नोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडले आहेत. या ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रिडींग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा 'एसएमएस' महावितरणकडून पाठविण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तातडीने तक्रार करून बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीजबिल तयार झाल्यानंतर बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा 'एसएमएस' ग्राहकांना पाठविला जातो. हा 'एसएमएस' बिल भरणा केंद्रावर दाखवून बिल भरता येते किंवा दिलेल्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन बिल भरणा करता येतो. 

याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा व पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याची पूर्वसूचना 'एसएमएस' मार्फत दिली जाते. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीज पुरवठा बंद झाला असल्यास त्याची माहिती व वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीची माहितीही या सुविधेतून मिळते. एखाद्या कारणास्तव मीटरचे रिडींग घेणे शक्य नसल्यास ग्राहकानेच मीटर रिडींग घेऊन ॲपद्वारे महावितरणला सादर करण्याबाबत तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची पूर्वसूचना 'एसएमएस'द्वारे  देण्यात येते. 

असा नोंदवा मोबाईल क्रमांक

नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG नंतर स्पेस द्यावा व त्यानंतर आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर 'एसएमएस' पाठवावा. या एका 'एसएमएस'वरून ग्राहकाच्या मोबाईलची नोंदणी होते. याशिवाय महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपवरूनही मोबाईलची नोंदणी करता येते.

टॅग्स :electricityवीज